कुजबुज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:35 AM2021-09-04T04:35:13+5:302021-09-04T04:35:13+5:30
प्रसार माध्यमातून आरोग्य विभागातर्फे संपूर्ण महाराष्ट्रात जनजागरण मोहीम राबविली जाते. कोरडा दिवस पाळा, नालीतील पाणी वाहते करा, असा ...
प्रसार माध्यमातून आरोग्य विभागातर्फे संपूर्ण महाराष्ट्रात जनजागरण मोहीम राबविली जाते. कोरडा दिवस पाळा, नालीतील पाणी वाहते करा, असा संदेश देऊन मोठा गाजावाजा केला जातो. शहरात ठिकठिकाणी मोठमोठे बॅनर लावून जनजागृती केली जात आहे. पण सडक अर्जुनी शहरातील १७ वाॅर्डातील बहुतेक नाल्या घाणीने भरल्या आहेत. नगर पंचायत होऊन आता साडेसहा वर्षे झालीत, पण नियोजनाच्या अभावामुळे नाल्यातील पाणी वाहते केले नाही, यालाच म्हणतात दिव्याखाली अंधार. कर्मचारी व अधिकारी फक्त पाणी वाहते करा, कोरडा दिवस पाळा, असा सल्ला देऊन जातात. मात्र, प्रत्यक्षात असे होत नसल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करून प्रचार व प्रसार केला जातो, पण फायदा होताना दिसत नाही. आरोग्य केंद्राच्या परिसरात सर्वत्र घाण पसरलेली असते. त्यामुळे दिव्याखाली अंधार असल्याचे चित्र आहे.
- राजेश मुनीश्वर