कुजबुज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:33 AM2021-09-05T04:33:30+5:302021-09-05T04:33:30+5:30
खरिपातील थकलेली ५० टक्के बोनसची रक्कम आणि रब्बीतील थकीत चुकाऱ्यांच्या रकमेवरून नेत्यांकडून शेतकऱ्यांना वांरवार तारखा दिल्या जात आहेत. त्यातच ...
खरिपातील थकलेली ५० टक्के बोनसची रक्कम आणि रब्बीतील थकीत चुकाऱ्यांच्या रकमेवरून नेत्यांकडून शेतकऱ्यांना वांरवार तारखा दिल्या जात आहेत. त्यातच शुक्रवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शेतकऱ्यांना बोनस आणि चुकाऱ्यांसाठी सोमवारची तारीख देऊन टाकली. त्यामुळे तारीख पे तारीख ऐकून त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, आतापर्यंत दिलेल्या सर्वच तारखा फेल ठरल्याने आता नानाभाऊंनी दिलेल्या नवीन तारखेला बोनस व चुकाऱ्यांची रक्कम खरोखरच खात्यावर जमा होणार का? याबाबत शेतकऱ्यांच्या मनात शंका आहे. कारण भाऊंनी पंधरा दिवस म्हणत दोन महिने वेळ मारून नेली. त्यामुळे नानाभाऊंनी दिलेली तारीख पुन्हा तारीख पे तारीख ठरू नये अशी आशा भोळ्या शेतकऱ्यांना आहे.
- अंकुश गुंडावार