कुजबुज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:33 AM2021-09-24T04:33:50+5:302021-09-24T04:33:50+5:30
वनाचे संरक्षण करण्यासाठी रात्रीची गस्त करून, वन तस्करांवर अंकुश ठेवण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची मनाची तयारी ...
वनाचे संरक्षण करण्यासाठी रात्रीची गस्त करून, वन तस्करांवर अंकुश ठेवण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची मनाची तयारी असली पाहिजे. वनजमिनीवर अतिक्रमण, सागवान चोरीचे प्रमाण वाढत आहे. रात्रीच्या वेळी वाहनाच्या माध्यमातून वन तस्करी होत असल्याच्या घटना पुतडी, देवपायली, दल्ली परिसरात घडल्या होत्या. सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र कार्यालयात कर्मचारी आहेत, शासकीय वाहन आहे, वाहन चालक आहेत. पण डिझेलचे वांदे असल्याने गस्त घालायची कशी, असा प्रश्न निर्माण होत आहे. शासकीय वाहनात डिझेलच मिळत नसल्यामुळे रात्रीची गस्त होत नसल्याची चर्चा वन कर्मचाऱ्यांत आहे. मौल्यवान वनसंपत्तीचे जतन करण्याची जबाबदारी असलेल्या वन कर्मचाऱ्यांना इथे डिझेलचे वांदे आहेत हो, म्हणण्याची वेळ आली आहे.
- राजेश मुनिश्र्वर