पांढरी आरोग्य केंद्र आॅक्सीजनवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 09:28 PM2018-09-03T21:28:10+5:302018-09-03T21:28:26+5:30
एकीकडे केंद्र व राज्य सरकार आरोग्य विषयक नवीन योजना आणीत आहे. मात्र दुसरीकडे ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे रुग्णांना उपचारापासून वंचित राहावे लागत असून खासगी रुग्णालयात जावून उपचार घ्यावे लागत असल्याचे चित्र सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी येथे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरी : एकीकडे केंद्र व राज्य सरकार आरोग्य विषयक नवीन योजना आणीत आहे. मात्र दुसरीकडे ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे रुग्णांना उपचारापासून वंचित राहावे लागत असून खासगी रुग्णालयात जावून उपचार घ्यावे लागत असल्याचे चित्र सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी येथे आहे.
प्राप्त माहितीनुसार रविवारी (दि.२) सकाळी ८ वाजता सुमारास हिमाली सेवक नाकाडे (२०) रा. मालीजुंगा हिला नाजूक स्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्र पांढरी येथे आणण्यात आले. त्या वेळी आरोग्य केंद्रामध्ये एकही प्रभारी अधिकारी हजर नव्हते. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकाला १०८ क्रमांकावर फोन करुन रुग्णवाहिका मागवून रुग्णाला गोंदिया येथे नेण्याची वेळ आली. दरम्यान या प्रकाराची दखल घेत सरपंच, पोलीस पाटील, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य व जिल्हा परिषद सदस्य व गावकºयांनी प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले. तसेच तालुका वैद्यकीय अधिकाºयांना प्रभारी डॉक्टर आरोग्य केंद्रात अनुपस्थित असल्याबाबत जाब विचारला. तेव्हा डॉ. मेश्राम यांनी सदर डॉक्टर ट्रेन सुटल्यामुळे रुग्णालयात पोहचू शकले नसल्याचे सांगितले.
मेश्राम यांच्या उत्तराने गावकºयांमध्ये रोष वाढला त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले. तसेच जिल्हा आरोग्य अधिकाºयांना फोन करुन याची माहिती दिली. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकाºयांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. या वेळी गावकºयांनी त्यांच्यासमोर समस्यांचा पाढा वाचला. रुग्णांना योग्य आरोग्य सेवा न देणाºया डॉक्टरांवर कारवाही करण्याची मागणी केली. प्राथमिक आरोग्य केंद्र पांढरी अंतर्गत नियमित कर्मचाºयांची ३० पदे मंजूर असून यापैकी ६ पदे रिक्त आहेत. कंत्राटी कर्मचाºयांचे १७ पदे मंजूर असून ४ पदे रिक्त आहेत.
दोन वैद्यकीय अधिकाºयाची पदे मागील काही वर्षापासून रिक्त आहेत. कंत्राटी डॉक्टरांवर प्राथमिक आरोग्य केंद्राचा भार आहे. ते सुध्दा कधी येतात तर कधी येत नाही. त्यामुळे बरेचदा रुग्णांना उपचाराविनाच परत जावे लागते. मात्र यासर्व गोष्टींकडे जिल्हा आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप गावकºयांनी या वेळी केला. तसेच प्रशासनावर रोष व्यक्त केला.
वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांची रिक्त पदे भरण्याची मागणी भाजप तालुकाध्यक्ष विजय बिसेन, सल्लू पठाण, सरपंच प्रतिभा मेश्राम, ग्रा.पं.सदस्य विलास बगडकर, रवि मेरगवार, दिलीप डागा, एकनाथ फुंडे, पोलीस पाटील अनिल मेंढे, निला ढोरे, पोलीस पाटील उत्तम कोटांगले, देवेंद्र तुरकर, विजय अग्रवाल यांनी या वेळी केली.