जोर का झटका देत ८ बाधितांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:21 AM2021-07-01T04:21:16+5:302021-07-01T04:21:16+5:30

गोंदिया : मागील आठवडाभरापासून ४-५ बाधितांनी भर पडत असल्याने कोरोना आता परतीच्या वाटेवर असल्याचे वाटत होते. मात्र, बुधवारी (दि. ...

Why 8 jerks full of blows | जोर का झटका देत ८ बाधितांची भर

जोर का झटका देत ८ बाधितांची भर

Next

गोंदिया : मागील आठवडाभरापासून ४-५ बाधितांनी भर पडत असल्याने कोरोना आता परतीच्या वाटेवर असल्याचे वाटत होते. मात्र, बुधवारी (दि. ३०) जिल्ह्यात थेट ८ बाधितांची भर पडल्याने कोरोनाने अद्याप जिल्हा सोडला नसल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाला पूर्णपणे निरोप देण्यासाठी गाफील न राहता नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज असल्याचे दिसून येत आहे.

कोरोनाची दुसरी अवघ्या देशासह जिल्ह्यासाठी अविस्मरणीय ठरली आहे. कित्येकांचा जीव घेतल्यानंतर आता कोरोना रुग्ण कमी झाल्याने शासनाने निर्बंध शिथिल करून देत जनजीवन सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी त्याचा चुकीचा अर्थ काढत अगदी बेभानपणे रस्त्यावर उतरून पुन्हा आपला मनमानीपणा सुरू केला आहे. आजघडीला शहरातील व त्यातही बाजारातील गर्दी बघता नागरिकांना एप्रिल व मे महिन्यातील कोरोना कहराचा विसर पडल्याचे दिसते. त्यामुळेच नियमांना बगल देत नागरिकांची बेभान वागणूक सुरू झाली आहे. कोरोनाची लाट आता ओसरू लागल्याने जिल्ह्यातही बाधितांची संख्या नियंत्रणात आली व दररोज ४-५ बाधितांची नोंद घेतली जात होती. मात्र, आठवडाभरात बुधवारी (दि.३०) थेट ८ बाधितांनी नोंद घेण्यात आल्याने संख्या पुन्हा वाढू लागल्याचे दिसले. यामुळे कोरोना पूर्णपणे गेला नसून नागरिकांचा गाफिलपणा अनर्थ करण्यास कारणीभूत ठरणार यात शंका नाही. त्यामुळे नागरिकांनी आता आणखी सावधपणाने वागण्याची गरज असून असे केले तरच जिल्ह्यातून कोरोना पूर्णपणे हद्दपार होणार व त्याचा प्रादुर्भाव पुन्हा वाढणार नाही.

--------------------------------

मंगळवारी एका मृत्यूची नोंद

एप्रिल व मे महिन्यात आलेल्या दुसऱ्या लाटेत कोरोनाने सुमारे ४००-४५० नागरिकांचा जीव घेतला. परिणामी जिल्ह्यातील मृतांची संख्या ७०० एवढी झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून ५७३ मृत्युसंख्या सांगितली जात असली तरी ही संख्याही कमी नाही. त्यात मंगळवारी (दि.२९) आणखी एका बाधिताच्या मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गोंदिया शहर कोरोना हॉटस्पॉट असल्याने शहरवासीयांनी आणखीच सावधानी बाळगण्याची गरज आहे.

--------------------------------

कठोर निर्बंधातून धोक्याची सूचना

दुसरी लाट ओसरत असल्याचे बघून राज्य शासनाने निर्बंध शिथिल केले होते. मात्र, आता कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ या नव्या रूपाने गोंधळ घातला आहे. त्यामुळे राज्यातच पुन्हा एकदा निर्बंध कठोर केले जात आहेत. म्हणजेच, या कठोरतेतून शासनाने धोक्याची सूचना दिली आहे. हे आता नागरिकांनी समजून घेण्याची गरज असून नियमांचे पालन व लसीकरण यावरच भर देण्याची खरी गरज आहे.

Web Title: Why 8 jerks full of blows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.