बाबासारखे डॉक्टर, पोलीस व्हायच का; मुले म्हणतात नको रे बाबा! (डमी)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:27 AM2021-05-17T04:27:27+5:302021-05-17T04:27:27+5:30

कोरोनाच्या संसर्गामुळे पोलीस व डॉक्टरांना अहोरात्र काम करावे लागत आहे. या काळात त्यांच्या कामाचे तासदेखील वाढविण्यात आले आहेत. सतत ...

Why should a doctor like Baba be a policeman? The children say no, Dad! (Dummy) | बाबासारखे डॉक्टर, पोलीस व्हायच का; मुले म्हणतात नको रे बाबा! (डमी)

बाबासारखे डॉक्टर, पोलीस व्हायच का; मुले म्हणतात नको रे बाबा! (डमी)

Next

कोरोनाच्या संसर्गामुळे पोलीस व डॉक्टरांना अहोरात्र काम करावे लागत आहे. या काळात त्यांच्या कामाचे तासदेखील वाढविण्यात आले आहेत. सतत कामात असल्याने कुटुंबाला वेळ देता येत नाही. त्यांना जेवणाच्या ताटावरून उठून जावे लागते. याचा परिणाम, त्यांच्या मुला-बाळांवर होत आहे. जर कोरोनाचा प्रादुर्भाव असाच राहिला तर भविष्यात काहींच्या मुलांनी डॉक्टर व पोलीस होण्यास नकार दिला आहे. तर काहींनी आपले वडील लोकांसाठी रात्रंदिवस काम करीत असल्याने डॉक्टर व पोलीस होऊन लोकांची सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर काहींनी आपल्या वडिलांसारखी नोकरी नको असे म्हटले आहे.

.....................

कोरोना योध्दे शासकीय रुग्णालयातील डॉक्टर- १००

आरोग्य कर्मचारी- ३०००

पोलीस अधिकारी- १२८

पोलीस कर्मचारी- २२१०

...........................

पोलीस व्हायला आवडेल पण...

१) माझे वडील पोलीस असल्याने नेहमीच कामात व्यस्त असतात. ते लोकांची सेवा करतात. ते घरी वेळ देत नसले तरी लोकांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. मलाही त्यांच्याप्रमाणेच पोलीस अधिकारी व्हायचे आहे.

- गौरव कटारे, कामठा

......

२) शिस्त, गस्त आणि बंदोबस्त यात राहून कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी रात्रंदिवस काम करणारे माझे वडील पोलीस असल्याने नेहमीच घराबाहेर असतात. कधी-कधी तर त्यांना जेवणाच्या ताटावरून उठावे लागते. कामामुळे आम्हाला वेळ देता येत नाही. त्यामुळे त्यांच्या कामाचा मला अभिमान आहे, पण तीच नोकरी मी पत्करावी असे मला वाटत नाही.

- ओम देशमुख, गोंदिया

....................

३) कोरोनाच्या संकटात माझे वडील पोलीस असल्याने नेहमीच घाईगडबडीत असतात. फोन आला की, जेवणाच्या ताटावरून त्यांना उठावे लागते. सणाच्या दिवशीही ते ड्युटीवर असतात. त्यामुळे भविष्यात मी त्यांना सुख देण्यासाठी अधिकारी होणार.

- सौरभ दीक्षित, गोंदिया

..........................

कोरोना असेल तर डॉक्टरकी नको

(१) माझे वडील स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. डॉक्टरांच्या कमतरतेमुळे बाबा सतत काम करीत असतात. आम्हाला वेळ कमी आणि रुग्णांनाच अधिकाअधिक वेळ देत असतात. कोरोनाच्या संकटातही त्यांनी खूप काम केले. घरपरिवाराकडे दुर्लक्ष करून त्यांनी काम केले. त्यांची मेहनत पाहून डॉक्टर होणे नाही तर मला सॉफ्टवेअर इंजिनीयर व्हायचे आहे.

- शौर्यन केंद्रे, गोंदिया

.........

(२) माझी आई निवासी वैद्यकीय अधिकारी आहे. कोविडमध्ये काम करताना किती दगदग होते. रुग्णांची सेवा करता करता तीच आजारी पडली. घरी आल्यावरही त्यांना फोनवर काम करावे लागते. कोरोनामुळे आम्हाला वेळ तर सोडाच, पण साध्या गपासुध्दा मारू शकत नाही. त्यामुळे मला भविष्यात डॉक्टर व्हायचे नाही.

- दीप्ती भोंगाडे, गोंदिया

.........................

(३) माझे वडील आमगावचे तालुका वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यांनी मागील सव्वा वर्षात कोविडमध्येही अहोरात्र सेवा देऊन मानवतेचे महान कार्य केले. हे कार्य माझ्याही हातून घडावे यासाठी मीसुध्दा डॉक्टर होणार आहे. माझे जीवन दुसऱ्याच्या सेवेसाठी लागेल यापेक्षा मोठे कार्य कोणतेही नाही.

- भार्गव चव्हाण, गोंदिया

Web Title: Why should a doctor like Baba be a policeman? The children say no, Dad! (Dummy)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.