लसीकरणानंतर ॲन्टिबाॅडीज तपासणी करायची कशासाठी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:19 AM2021-07-19T04:19:18+5:302021-07-19T04:19:18+5:30
गोंदिया : कोरोनाविरुध्दच्या लढ्यात लसीकरण हे महत्त्वपूर्ण शस्त्र आहे. त्यामुळे शासनानेसुध्दा लसीकरणावर भर दिला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामुळे शरीरात ...
गोंदिया : कोरोनाविरुध्दच्या लढ्यात लसीकरण हे महत्त्वपूर्ण शस्त्र आहे. त्यामुळे शासनानेसुध्दा लसीकरणावर भर दिला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामुळे शरीरात ॲन्टिबॉडीज तयार होत असल्याने कोरोनाला प्रतिबंध करण्यास मदत होते. त्यामुळेच नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस दिले जात आहेत. लसीकरणानंतर ३० ते ३५ दिवसांत शरीरात ॲन्टिबाॅडीज तयार होत असल्याने कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होते. त्यामुळे नागरिकांनी कोरोना लसीकरण करून घेण्याची गरज आहे. लसीकरणानंतर शरीरात ॲन्टिबाॅडीज तयार झाले किंवा नाही याची तपासणी करण्याची गरज आहे, असा प्रश्न काही नागरिकांना पडला आहे. मात्र डॉक्टरांनीसुध्दा ॲन्टिबाॅडीज तपासणी करण्याची कुठलीच गरज नसल्याचे सांगितले.
............
ॲन्टिबाॅडीजच्या दृष्टीने तपासणी नाही
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केल्यानंतर शरीरात ॲन्टिबाॅडीज तयार झाले किंवा नाही यासाठी रुग्णालयात जाऊन तपासणी केली जात आहे. या तपासणीसाठी खर्चदेखील येतो. गोंदिया येथील शासकीय महाविद्यालयात ॲन्टिबाॅडीज तपासणीसाठी येणाऱ्यांची संख्या शून्य आहे.
..............
तपासणी करण्याची गरज नाही
कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा डोस घेतल्याने कोरोनाचा संसर्ग होण्यापासून बचाव करण्यास मदत होते. त्यामुळे प्रतिबंधात्मक लस घेणे आवश्यक आहे, तर लसीकरण केल्यानंतर ॲन्टिबाॅडीज तयार झाले किंवा नाही याची तपासणी करण्याची कुठलीही गरज नाही.
- डॉ. नरेश तिरपुडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया
.................
लसीकरणात तरुणांची संख्या अधिक
जिल्ह्यात आतापर्यंत ५ लाख ३२ हजार ३८३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे, तर लसीकरणाप्रति जनजागृती वाढत आहे. आधी लसीकरणात ज्येष्ठांनी आघाडी घेतली होती. मात्र आता जिल्ह्यात तरुणाईचा टक्का वाढल्याचे चित्र आहे.
................
जिल्ह्यातील लसीकरण
पहिला डोस : ४,२५,४६३
दोन्ही डोस : १,०६,९२०
एकूण लोकसंख्येच्या तुलनेत प्रमाण : ४०