सिध्दार्थ विद्यालयात वन्यजीव सप्ताह

By admin | Published: October 16, 2016 12:26 AM2016-10-16T00:26:57+5:302016-10-16T00:26:57+5:30

सिध्दार्थ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ठाणेगाव येथे गांधी सप्ताह आणि वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला.

Wildlife Week at Siddhartha College | सिध्दार्थ विद्यालयात वन्यजीव सप्ताह

सिध्दार्थ विद्यालयात वन्यजीव सप्ताह

Next

तिरोडा : सिध्दार्थ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ठाणेगाव येथे गांधी सप्ताह आणि वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला.
अध्यक्षस्थानी मिलिंद मागासवर्गीय शिक्षण संस्थेचे एस.टी. बोरकर, सचिव तथा माजी आ. दिलीप बंसोड, जि.प. सदस्य प्रीती रामटेके, मनोहर खोब्रागडे, अध्यक्ष तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भरत रहांगडाले, ग्रा.पं. सदस्य कैलाश पटले, कोषाध्यक्ष एस.बी. बन्सोड, भाकचंद पटले, ताराचंद डोमळे, रामचंद्र पटले उपस्थित होते.
या वेळी संस्थेचे सचिव दिलीप बंसोड यांनी स्वच्छता अभियान तसेच वन्यजीवांचे रक्षण करण्यासाठी सगळ्यांनी जागृत राहून कार्य करण्याचे आवाहन केले.
या वन्यजीव सप्ताहच्या अनुषंगाने हरितसेना प्रभारी यु.आर. बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावात शोभायात्रा काढण्यात आली. विद्यालयात निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच विविध उपक्रम घेण्यात आले.
वन्यजीव सप्ताह निमित्ताने विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक आर.डब्ल्यू. चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. सिध्दार्थ रामटेके यांनी वन्यजीव सप्ताह निमित्ताने जनजागृती करावी, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, निसर्ग मंडळातील विद्यार्थी तसेच स्काऊट, गाईड पथकाने सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Wildlife Week at Siddhartha College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.