कोरोना योद्धांच्या कुटुबीयांना ५० लाखांची मदत मिळणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 05:00 AM2020-10-07T05:00:00+5:302020-10-07T05:00:09+5:30
गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत ११ कोरोना योध्दांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सर्वाधिक संख्या शिक्षकांची आहे. दोन पोलीस व महसूल विभागातील दोन कर्मचारी अश्या एकूण ११ जणांचा कोरोना योध्दा म्हणून नोकरी करताना मृत्यू झाला. या ११ पैकी पोलीस विभागाचे दोन प्रस्ताव शासनाला गेले आहेत. त्यापैकी पोलीस विभागातील दोन पैकी राजेश दोनोडे यांचा प्रस्ताव काल (दि.५) रोजी मजंूर झाला.
नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोदिया : कोरोनाच्या महामारीत लोकांची काळजी घेता घेता स्वत:चे जीवन वाहून देणाºया कोरोना योध्दांना वीर मरण पत्कारावे लागले. त्या मृत पावलेल्या योध्दांना शासनाने ५० लाखाचे विमा सुरक्षा कवच लागू केले होते.
गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत ११ कोरोना योध्दांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सर्वाधिक संख्या शिक्षकांची आहे. दोन पोलीस व महसूल विभागातील दोन कर्मचारी अश्या एकूण ११ जणांचा कोरोना योध्दा म्हणून नोकरी करताना मृत्यू झाला. या ११ पैकी पोलीस विभागाचे दोन प्रस्ताव शासनाला गेले आहेत. त्यापैकी पोलीस विभागातील दोन पैकी राजेश दोनोडे यांचा प्रस्ताव काल (दि.५) रोजी मजंूर झाला. येत्या दोन चार दिवसात इमरान काजी यांचाही प्रस्ताव मंजूर होणार असल्याचे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी सांगितले. सात शिक्षकांचा कोरोनाने मृत्यू झाला. परंतु यातील दोनच शिक्षकांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेला प्राप्त झाले. पाच शिक्षकांचे प्रस्तावच आले नाहीत. जे दोन प्रस्ताव आले त्यापैकी ते दोन्ही ही शासनाच्या अटीत बसत नसल्याचे शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांनी सांगितले. कोरोना झाल्याच्या १४ दिवसात कोरोनाची नोकरी बजावली आहे का? व तो कोरोना पॉझिटिव्ह आहे का हे दोन्हीही गोष्टी चाचपणी केल्यानंतर कोरोना योध्दाचा विमा कवच दिले जात असल्याचे हिवारे यांनीे सांगितले.
कोरोना योद्ध्यांना सलाम
राजेश दोनोडे
कर्तव्य बजावताना माझ्या पतीला कोरोनाची लागण झाली.परिणामी उपचारादरम्यान वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. पोलीस विभागाने तत्परता दाखवून विम्याचे ५० लाख रूपये मंजूर करवून दिल्याची माहिती किशोरी दोनोडे यांनी दिली.
इमरान काजी
रामनगर पोलीस ठाण्यातील इमरान काजी यांचा कोरोनाने मृत्यू झाला. अजूनपर्यंत कोरोना योध्दांचा विमा सुरक्षा कवच म्हणून शासनाने ठरविलेली रक्कम मिळाली नाही. प्रस्ताव शासनाकडे पाठविल्याचे सांगण्यात आले असे शबाना काजी म्हणाल्या.
टाकीलाल सोनवाने
घरातील आधारस्तंभच हरविल्याने उपजिवीका कशी चालवायची हा प्रश्न पुढे आहे. वडिलांच्या मृत्यूला आता महिना होत असूनही यासंदर्भात प्रस्तावही मागविले नाही,असे काटीलाल सोनावने यांचे चिरंजीव सौरभ म्हणाले.
कमलकिशोर परिहार
घरातील कर्तेधर्ते वडीलच असल्याने कुटुंबाचा कण मोडला.मोडलेल्या कणा कसा सावरायचा हे कळत नाही. कोरोना योध्दांना शासनाने विमा कवच देण्याचे म्हटले होते. पण माहिती मागीतली नाही असे हर्षीत परिहार म्हणाले.
कोरोना योध्दांना विमा कवच म्हणून शासनाने ५० लाख रुपयांचा विमा काढला होता. यासंबंधीचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्यांना शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार मदत दिली जाईल. कोरोना योध्दांचे कुटुंबीय मदतीपासून वंचित राहणार नाही, याची जिल्हा प्रशासन निश्चितच काळजी घेईल.
- दीपक कुमार मीणा, जिल्हाधिकारी, गोंदिया