लोकांचे जीव गेल्यावर तो खड्डा बुजविणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:21 AM2021-06-03T04:21:28+5:302021-06-03T04:21:28+5:30

मामा चौकातील डॉ.कार्लेकर यांच्या दवाखान्याजवळ व आदर्श कॉन्व्हेंटच्या मागे असलेल्या वसाहतीत एक शंभर बाय सोळा फुटाचा मोठा खड्डा पडला ...

Will he fill the hole when people die? | लोकांचे जीव गेल्यावर तो खड्डा बुजविणार का?

लोकांचे जीव गेल्यावर तो खड्डा बुजविणार का?

Next

मामा चौकातील डॉ.कार्लेकर यांच्या दवाखान्याजवळ व आदर्श कॉन्व्हेंटच्या मागे असलेल्या वसाहतीत एक शंभर बाय सोळा फुटाचा मोठा खड्डा पडला आहे. या खड्डयामध्ये चार व्यक्तींचे प्लाट असून त्यावर अद्यापही कुठलेही बांधाम करण्यात आले नाही. या खड्डयाच्या परिसरात वसाहत लागून असल्याने या वसाहतीतील नागरिकांची सातत्याने या परिसरात ये-जा सुरु असते. लहान मुले सुध्दा या खड्डयात पडल्याच्या आतापर्यंत चार ते पाच घटना घडल्या आहेत. या खड्डयामध्ये सांडपाणी साचले असून परिसरात डासांचा सुध्दा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येत्या काही दिवसातच पावसाला सुरुवात होईल. अशात या खड्डयात पाणी साचून पुन्हा समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा खड्डा बुुजविण्यात यावी याबाबत लेखी निवेदन नगराध्यक्ष, मुख्याधिकारी तसेच प्लाट मालकाला दिले. परंतू त्यांनी अद्यापही याची दखल घेतली नाही. त्यामुळे ही समस्या कायम आहे. त्यामुळे हा खड्डा या परिसरातील नागरिकांसाठी जीवघेणा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नगर परिषदेने याची त्वरित दखल घेवून खड्डा बुजवावा अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वाॅर्डातील संध्या अंबुले, बबिता बघेले, सीमा पटेल, लिना चव्हाण, आशा खंडेलवाल, तनू बिसेन, मनिषा पारधी, रुपलता कटरे, अर्चना दहीकर यांनी दिला आहे.

Web Title: Will he fill the hole when people die?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.