बीपीएलचा दाखला ग्रामपंचायतमधून देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 11:56 PM2019-08-10T23:56:39+5:302019-08-10T23:57:10+5:30
गोंदिया पंचायत समितीची वार्षिक आमसभा शुक्रवारी पं.स.च्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती.आमसभेत दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांना पंचायत समितीऐवजी ग्रामपंचायत मधून दाखले देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया पंचायत समितीची वार्षिक आमसभा शुक्रवारी पं.स.च्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती.आमसभेत दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांना पंचायत समितीऐवजी ग्रामपंचायत मधून दाखले देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.
आमसभेला आ.गोपालदास अग्रवाल, जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, शिक्षण व आरोग्य सभापती रमेश अंबुले, पं.स.सभापती माधुरी हरीणखेडे, गटविकास अधिकारी जावेद ईनामदार, उपसभापती चमन बिसेन यांच्यासह जि.प.व पं.स.सदस्य उपस्थित होते.या वेळी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी यांनीही आमसभेला मार्गदर्शन केले.सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर उपस्थित होते.
या वेळी सरपंच-उपसरंपच संघटनेच्यावतीने काम येणाऱ्या अडचणी सभागृहात मांडण्यात आल्या. तसेच प्रत्येक ग्रामपंचायत अंतर्गत यावर्षी वृक्ष लागवड करण्यात आली. मात्र यासाठी निधी कोण देणार असा सवाल उपस्थित केला. पालकमंत्री पांदन रस्त्यांच्या कामाचा निधी अद्यापही मिळाला नसल्याचा मुद्दा या वेळी उपस्थित करण्यात आला. शासनाच्या नवीन निर्णयामुळे अनेक दाखले ग्रामपंचायतमधून देणे बंद करण्यात आले.त्यामुळे नागरिकांना पंचायत समितीपर्यंत पायपीट करावी लागत आहे. शंकर टेंभरे, चिंतामण चौधरी यांनी गावातील शाळेच्या शिक्षकासंबंधी समस्या मांडल्या.
रवी पटले,नरेंद्र चिखलोंडे, युगेश्वरी ठाकरे यांच्यासह सरपंचानी गावातील समस्या मांडल्या.यापैकी बहुतेक समस्यांचे निवारण सभेतच करण्यात आले.
नागरिकांना बीपीएल दाखल्यासाठी पंचायत समितीपर्यंत धाव घ्यायची वेळ येऊ नये,यासाठी गटविकास अधिकारी जावेद इनामदार यांनी हे दाखले ग्रामपंचायतमधूनच देण्याची ग्वाही दिली.