न्यूमोकोकल लस रोखणार बालमृत्यू?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:33 AM2021-07-14T04:33:53+5:302021-07-14T04:33:53+5:30

नरेश रहिले गोंदिया : न्यूमोकोकल आजार ही एक मोठी सामाजिक आरोग्य समस्या आहे. न्यूमोनियाचे ते एक प्रमुख कारण ...

Will pneumococcal vaccine prevent infant mortality? | न्यूमोकोकल लस रोखणार बालमृत्यू?

न्यूमोकोकल लस रोखणार बालमृत्यू?

Next

नरेश रहिले

गोंदिया : न्यूमोकोकल आजार ही एक मोठी सामाजिक आरोग्य समस्या आहे. न्यूमोनियाचे ते एक प्रमुख कारण आहे. भारतात २०१० मध्ये जवळपास एक लाख ५ हजार बालमृत्यू हे न्यूमोनियाने झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. हा आजार संसर्गजन्य असून तो एका व्यक्तीपासून दुसऱ्याला खोकला किंवा शिंकताना संपर्कात आल्यामुळे पसरतो. न्यूमोनिया आजाराचा सर्वाधिक धोका २ महिने ते २ वर्षांखालील बालकांना असल्याने जिल्ह्यात न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिनेशन मोहीम राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यासाठी विशेष कार्यशाळा पार पडली आहे. आरोग्य विभागातील १०० डॉक्टर व ३ हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या कार्यशाळेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन कापसे व इतर डॉक्टर उपस्थित होते. गोंदिया जिल्ह्याला न्यूमोकोकल लसीचे १३०० डोज मिळाले आहेत, १४ आठवडे व नऊ महिने या वयोगटातील लाभार्थ्यांना देण्यात येणार आहेत. चिमुकल्यांना लसीकरण करण्यासाठी न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिनेशन जिल्ह्याला १ हजार ३०० डोज मिळाले आहेत. ते डोज जिल्ह्यातील बालमृत्यू रोखण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत.

......................

काय आहे न्यूमोकोकल न्यूमोनिया ?

न्यूमोकोकल आजार म्हणजे स्ट्रोक स्ट्रेष्टोकोकस न्यूमोनिया हा बॅक्टेरियामुळे होणारा आजार आहे. न्यूमोकोकल बॅक्टेरिया शरीरातील विविध भागांत पसरून वेगवेगळे आजार उत्पन्न करू शकतो. न्यूमोकोकल न्यूमोनिया हा श्वसन मार्गाला होणारा एक संसर्ग आहे. त्यामुळे दुर्लक्ष केल्यास तो प्राणघातक ठरू शकतो.

.........................

न्यूमोकोकल कॉन्जुगेट गेट लसीचे फायदे

-न्यूमोकोकल कॉन्जुगेट लस ६ आठवड्यांपेक्षा कमी वयाच्या अर्भकाची न्यूमोकोकल आजारापासून रक्षण करते.

- बालकांना ज्यावेळी सर्वाधिक धोका असतो. ही लस गंभीर न्यूमोकोकल आजार, जसे न्यूमोनिया, मेनिजायंटीस आणि बॅक्टेरियापासून लहान मुलांचे संरक्षण करते.

...............

या आजाराची लक्षणे

-खोकला, धाप लागणे, श्वास घ्यायला त्रास होणे ही न्यूमोकोकल न्यूमोनियाची प्राथमिक लक्षणे आहेत.

-ज्यामुळे फुफ्फुसांवर सूज येऊन त्यात पाणी भरू शकते. त्यामुळे श्‍वास घ्यायला त्रास होतो. शिवाय शरीरातील ऑक्सिजन कमी होऊ शकते.

-जर आयार गंभीर असेल तर मुलांना खाण्यापिण्यात अडचण येऊ शकते. मृत्यूदेखील होऊ शकतो.

.............

जिल्ह्याला १३०० डोज

गोंदिया जिल्ह्याला न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिनचे १३०० डोज मिळाले आहेत. त्यापैकी प्रत्येक उपकेंद्राला २५ डोज वाटप करण्यात आले आहेत. लसीकरणाला गोंदिया जिल्ह्यात सुरुवात झाली आहे.

................

जिल्ह्यातील बालकांचा जन्म-मृत्युदर

वर्ष------------जन्म----- अर्भक मृत्यू---- बालमृत्यू

२०१९-२०-----१७३०५-----४५४------------२९४

२०२०-२१-----१६३४४-----४६५------------२८७

२०२१-२२-----३५७१-----१०९------------५४

..................

कोट

बालमृत्यू रोखण्यासाठी न्यूमोकोकल कॉन्जुगेट उपयुक्त आहे. महागडी असणारी ही लस पूर्वी बाजारपेठेत मिळायची तर आता शासनाने ती शासकीय रुग्णालयात उपलब्ध करून दिली आहे. हे सुरक्षित असून पालकांनी आपल्या पाल्यांना लस द्यावी.

डॉ. नितीन कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी, गोंदिया

...............................

Web Title: Will pneumococcal vaccine prevent infant mortality?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.