सेंद्रीय शेती शेतकऱ्यांसाठी वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 12:24 AM2018-09-16T00:24:05+5:302018-09-16T00:24:38+5:30

शेतकरी रासायनिक खते, विविध किटकनाशके व औषधांचा वापर करीत आहेत. आवश्यकतेपेक्षा अधिक रासायनिक खतांचा वापर केल्याने जमिनीची पोत कमी होत चालली आहे. त्याचाच परिणाम जमिनीच्या आरोग्यावर होत आहे.

Wine Farming for Farmers | सेंद्रीय शेती शेतकऱ्यांसाठी वरदान

सेंद्रीय शेती शेतकऱ्यांसाठी वरदान

Next
ठळक मुद्देएस.आर. पुस्तोडे : नांदलपार येथे सेंद्रीय शेती शेतकरी प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : शेतकरी रासायनिक खते, विविध किटकनाशके व औषधांचा वापर करीत आहेत. आवश्यकतेपेक्षा अधिक रासायनिक खतांचा वापर केल्याने जमिनीची पोत कमी होत चालली आहे. त्याचाच परिणाम जमिनीच्या आरोग्यावर होत आहे.
या बाबीवर मात करण्यासाठी तसेच आरोग्य सुदृढ राहण्यासाठी सेंद्रीय शेती शेतकºयांसाठी वरदान असल्याचे प्रतिपादन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक एस.आर.पुस्तोडे यांनी केले. तालुक्यातील ग्राम नांदलपार येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व तालुका कृषी अधिकारी यांच्या संयुक्तवतीने राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत आयोजीत सेंद्रीय शेती शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक उमेश आर. सोनेवाने उपस्थित होते. पुढे बोलताना पुस्तोडे यांनी, रासायनिक खते व औषधांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने जमिनीचे आरोग्य खालावले, पाणी दूषीत झाले तर वातावरणात त्याचे विपरीत परिणाम होत आहे. उत्पादीत शेतमाल विषयुक्त झाल्याने त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे.
यावर रामबाण उपाय सेंद्रीय शेती हे असल्याचे सांगून त्यांनी सेंद्रीय शेतीचे महत्व, फायदे, सेंद्रीय अन्नधान्याची मागणी रासायनिक खते, औषधी यापासून होणारे दुष्परिणाम सांगीतले. तसेच शासनामार्फत दिले जाणाऱ्या अनुदानाची माहिती दिली. तर सोनेवाने यांनी, शेतकऱ्यांनी उपलब्ध संसाधनांचा वापर करुन कोणतीही निविष्ठा बाजारपेठातून न घेता सेद्रीय निविष्ठा कशी तयार करता येईल हे सांगीतले. तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे दर्शपर्णी अर्क व जीवामृत कसे तयार करायचे हे शेतकऱ्यांना दाखवून दिले.

शेतकरी गटाची स्थापना
प्रशिक्षणात नांदलपर येथील साईबाबा सेंद्रीय शेतकरी गटातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रीय शेती) सन २०१८-१९ अंतर्गत ५० शेतकऱ्यांचे गट स्थापन करुन त्या शेतकऱ्यांना आत्मा व कृषी विभाग मार्फत सेंद्रीय शेती संबंधी प्रशिक्षण देण्यात आले.

Web Title: Wine Farming for Farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती