‘वाॅक’वेळी महिलेची चेन हिसकावली; पोलिसांनी माग काढला, चोर पकडला
By नरेश रहिले | Published: October 4, 2023 09:30 PM2023-10-04T21:30:04+5:302023-10-04T21:30:29+5:30
खालसा धाबा समोरील घटना : १० ग्रॅमची सोन्याची साखळी केली जप्त.
नरेश रहिले, गोंदिया: जेवणानंतर पायी फिरणाऱ्या तरूणीच्या गळ्यातील सोन्याची साखळी ओढून नेत असलेल्या चोरट्याला वेळीच साध्या वेषातील पोलिसांनी वेळीच पकडले. ही घटना ३ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता निर्मल टॉकीज समोरील खालसा ढाबाजवळ घडली.
गोंदिया येथील सिंधी कॉलनी येथील वंशीका जितेंद्र कगवानी रा.सिंधी कॉलनी ही आपल्या वहिनीसोबत रात्री जेवन केल्यानंतर पायी फिरत असतांना खालसा धाबा समोर एक अनोळखी मोटारसायकल चालकाने विरूध्द दिशेने जवळ येऊन तिच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरीने ओढून नेली. यावेळी वंशिकाने जोरजोराने ओरडल्याने रस्त्याने जाणे-येणाऱ्या साध्या वेशातील पोलिसांनी त्याला पकडले. नौमीत कबीर सोनवाने (२०) रा. गौशाला वाॅर्ड, गोंदिया त्या आरोपीचे नाव आहे. त्याची झडती घेतली असता त्याच्या पँटच्या खिशातून सोन्याची चैन वजन १० ग्रॅम किंमत ६० हजार रूपये जप्त करण्यात आले. त्याच्यावर गोंदिया शहर पोलिसात भादंविच्या कलम ३९२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
यांनी केली कारवाई
पोलिस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील, पोलीस हवालदार जागेश्वर उईके, पोलिस हवालदार कवलपालसिंग भाटीया सुदेश टेंभरे, सतिश शेंडे, प्रमोद चव्हाण, दिपक रहांगडाले, महिला पोलीस हवालदार रिना चव्हाण, पोलिस शिपाई दिनेश बिसेन, सुभाष सोनवाने, मुकेश रावते, कुणाल बारेवार, अशोक रहांगडाले यांनी केली आहे.