धक्कादायक! बसमध्ये चढताना महिलेची रोकड केली लंपास

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 04:20 PM2023-12-12T16:20:40+5:302023-12-12T16:21:37+5:30

पिशवीत होते ३७,८०० रुपये रोख, आमगाव बसस्थानक येथील घटना.

woman was robbed of cash while boarding a bus In gondia | धक्कादायक! बसमध्ये चढताना महिलेची रोकड केली लंपास

धक्कादायक! बसमध्ये चढताना महिलेची रोकड केली लंपास

कपिल केकत ,गोंदिया : बँकेतून घेतलेल्या कर्जाची रक्कम घेऊन बसमध्ये चढत असताना चोरट्यांनी महिलेच्या पिशवीतून ३७ हजार ८०० रुपये रोख लंपास केले. आमगाव बसस्थानक येथे सोमवारी (दि.११) दुपारी १ वाजता दरम्यान ही घटना घडली .पिशवीत असलेले  ३७,८०० रुपयांची  रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. आमगाव बसस्थानक परिसरात येथे  ही घटना घडली आहे.  

फिर्यादी तेजस्वीनी खिलेश्वर बिसेन (२५,रा. दहेगाव) या घरकाम करणाऱ्या महिलेने आमगाव येथील सहयोग बँकेतून घेतलेल्या कर्जाचे ३७ हजार ८०० रुपये प्लास्टिक पिशवीमध्ये टाकून आमगाव येथील बसस्थानकात बसमध्ये चढत होत्या. हीच संधी साधून अज्ञात चोरट्यांनी प्लास्टिक पिशवीला बाजूने कापून रोख ३७ हजार ८०० रुपये लंपास केले. पोलिसांनी प्रकरणी भादंवि कलम ३७९ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.

Web Title: woman was robbed of cash while boarding a bus In gondia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.