महिलांनी केला पालकमंत्र्याचा घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 10:02 PM2018-09-24T22:02:55+5:302018-09-24T22:03:14+5:30
महात्मा गांधी तंटामुक्तीचा विशेष पुरस्कार घेणाऱ्या सडक-अर्जुनी अतिसंवेदनशील ठरवित शेषराव गिºहेपुंजे यांना हद्दपार करण्याचे १४४ चे नोटीस बजावल्यानंतर सडक-अर्जुनी येथील महिलांनी पालकमंत्री राजकुमार बडोले यांचा घेराव केला. तब्बल चार तास सुरू राहिलेल्या या प्रकारानंतर दिलेला नोटीस रद्द केल्यामुळे सडक-अर्जुनी येथील गणेशोत्सव शांततेत पार पडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महात्मा गांधी तंटामुक्तीचा विशेष पुरस्कार घेणाऱ्या सडक-अर्जुनी अतिसंवेदनशील ठरवित शेषराव गिºहेपुंजे यांना हद्दपार करण्याचे १४४ चे नोटीस बजावल्यानंतर सडक-अर्जुनी येथील महिलांनी पालकमंत्री राजकुमार बडोले यांचा घेराव केला. तब्बल चार तास सुरू राहिलेल्या या प्रकारानंतर दिलेला नोटीस रद्द केल्यामुळे सडक-अर्जुनी येथील गणेशोत्सव शांततेत पार पडले.
डुग्गीपार पोलिसांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे शेषराव गिऱ्हेपुंजे यांना गणेश उत्सवाच्या मिरवणुकीत भाग घेऊ नका, त्या दिवशी सडक-अर्जुनी येथे राहायचे नाही अशी नोटीस बजाविण्यात आली होती.
या नोटीसमुळे गावातील वातावरण तापले होते. गावातील महिलांनी एकत्र येऊन पालकमंत्री बडोले यांचे घर गाठले. त्यांना हा प्रकार सांगून पोलीसच शांतता भंग करीत असल्याचे सांगितले. महिलांनी डुगीपार पोलिस ठाण्याचाही घेराव केला होता.
यासंदर्भात वैशाली गिऱ्हेपुंजे यांनी मुख्यमंत्र्याशीही मोबाईलवर चर्चा केली. त्यानंतर गिऱ्हेपुंजे यांना दिलेला नोटीस रद्द करण्यात आला. परिणामी आनंदात गणेश विसर्जन करण्यात आले.