महिलांनी पकडली अवैध दारू ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:28 AM2021-04-11T04:28:02+5:302021-04-11T04:28:02+5:30
पांढरी येथे दारूबंदी असताना काही अवैध दारू विक्रेते दारू विक्री करीत गावातील वातावरण दूषित करीत आहेत. याआधी या महिलांनी ...
पांढरी येथे दारूबंदी असताना काही अवैध दारू विक्रेते दारू विक्री करीत गावातील वातावरण दूषित करीत आहेत. याआधी या महिलांनी दारूबंदीसाठी अनेक आंदोलने ही केली. मात्र अवैध दारू विक्रेत्यांवर याचा काहीही परिणाम झालेला नाही. त्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांना धडा शिकविण्यासाठी त्यांच्यावर पाळत ठेवून जिजामाता महिला परिवर्तन पॅनलच्या महिला दारू पकडण्याचे काम करीत आहे. यातच त्यांना अवैध दारू विक्रीची माहिती मिळाली असता त्यांनी दारू विक्रेत्याच्या घरी जाऊन दारू पित असताना त्याला रंगेहात पकडले. तर दारूच्या काही बाटल्या जमिनीखाली पुरलेल्या होत्या त्या सुद्धा त्या महिलांनी काढून एकूण ११२ बॉटल्स जप्त केल्या. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली असता पांढरी बीटचे पोलीस डोंगरवार यांनी घटनास्थळी जाऊन कारवाई केली. याप्रसंगी जिजामाता महिला परिवर्तन पॅनलच्या हिमकला प्रधान, किरण मेश्राम, सुनीता येडे, छाया पटले, सुशीला केवट, कुसुम ठाकरे, मंगला अंबुले, प्रमिला पटले, अलका ठाकरे, सुलोचना अंबुले आदी महिला उपस्थित होत्या.