मधमाश्यांच्या हल्ल्यात महिला मृत

By admin | Published: October 4, 2015 02:39 AM2015-10-04T02:39:05+5:302015-10-04T02:39:05+5:30

सालेकसा तालुक्यातील सोनपुरी येथील पंचफुला धरमदास बावनकर व अंजना पिरम पावनकर या महिला शेतामध्ये गेल्या असता...

Women die in beekeeping attack | मधमाश्यांच्या हल्ल्यात महिला मृत

मधमाश्यांच्या हल्ल्यात महिला मृत

Next


बिजेपार : सालेकसा तालुक्यातील सोनपुरी येथील पंचफुला धरमदास बावनकर व अंजना पिरम पावनकर या महिला शेतामध्ये गेल्या असता मधमाश्यांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. त्यात पंचफुला धरमदास बावनकर ही महिला केटीएस रुग्णालयात उपचार करतेवळी मरण पावली. व दुसरी महिला रूग्णालयात भरती आहे.
प्रत्यक्षदर्शीनुसार ज्यावेळी महिलेवर मधमाश्यांनी हल्ला केला. संपूर्ण शरीरावर मधमाश्यांनी चावा घेतला होता. मृतक महिला आपला जीव वाचविण्यासाठी शेतातील धानामध्ये आपले तोंड जमिनीवर रगडत एक हजार मीटरपर्यंत घसरत गेल्या. यात त्या बेशुध्द पडल्या. त्यांना उपचारासाठी केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. या महिलेचा कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी जि.प. सदस्य विजय टेकाम, सभापती हिरालाल फाफनवाळे, पं.स. सदस्य दिलीप वाघमारे, पं.स. सदस्य भरत लिल्हारे यांनी तहसीलदाराकडे केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Women die in beekeeping attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.