नारी सशक्तीकरण काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:31 AM2021-02-24T04:31:02+5:302021-02-24T04:31:02+5:30

परसवाडा : देशात लोकशाहीचे राज्य असून, प्रत्येक महिला नागरिकांना आपले विचार मांडण्याचा हक्क आहे; पण आजही ग्रामीण व शहरी ...

Women empowerment needs time | नारी सशक्तीकरण काळाची गरज

नारी सशक्तीकरण काळाची गरज

googlenewsNext

परसवाडा : देशात लोकशाहीचे राज्य असून, प्रत्येक महिला नागरिकांना आपले विचार मांडण्याचा हक्क आहे; पण आजही ग्रामीण व शहरी भागातील महिला सामाजिक कार्यात मागे आहेत. त्यांच्याकडे डोळ्यासमोर समाज, कुटुंब समोर येते. पुरुष मंडळी या नव्या युगात आजही महिला समोर येण्यासाठी अडवितात. यासाठी आम्ही प्रत्येक समाजातील महिलांना सशक्त नारी, या कार्यक्रमांतर्गत आर्थिक सक्षमीकरण व नारी सशक्तीकरणाचे प्रशिक्षण देऊ, असे प्रतिपादन पाटबंधारे विभागाच्या उपकार्यकारी अभियंता शिखा पिपलेवार यांनी केले.

नारी कौशल्य, गृह,उद्योग मार्गदर्शन, सामाजिक चेतना, वूमन राईटस व ड्युटी डीवीए अशा अनेक प्रश्नांवर माहिती जाणीव व मार्गदर्शन कार्यक्रम येथील बाजपेई वार्डातील क्षत्रीय मराठा कलार समाज मंगल कार्यालयात सोमवारी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सविता बेदरकर या होत्या. यावेळी डॉ. लोकेश चिर्वतकर, शोभा धुवारे, सिंधू पिपलेवार, नेहा धुवारे, पूजा डहाके, आरती धपाडे, ॲड. दखने, डॉ. सोनवाने, हेमलता विजयवंशी, छाया जमईवार, डॉ. सुरेश पिपलेवार उपस्थित होते. सर्वप्रथम कलार समाजाचे आधारदैवत सहस्त्रबाहु अर्जुन यांच्या तैलचित्राला माल्यार्पण व पूजा अर्चना मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. कोविड-१९ चे मास्क सॅनिटायझर नियमांचे पालन करून कार्यक्रम घेण्यात आला.

Web Title: Women empowerment needs time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.