रूरल मार्टच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 05:00 AM2020-07-30T05:00:00+5:302020-07-30T05:00:42+5:30
सिव्हील लाईन्स परिसरातील राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्डच्या सहायाने महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालयाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या रूरल मार्टच्या उद्घाटनप्रसंगी बुधवारी (दि.२९) त्या बोलत होत्या. याप्रसंगी आमदार सहसराम कोरोटे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नीरज जागरे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे प्रामुख्याने उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ग्रामीण आणि शहरी भागातील महिला बचत गटांच्या माध्यमातून संघटीत झाल्या आहेत. त्या केवळ संघिटत नाही तर त्यांनी उद्योग-व्यवसाय सुरू केले आहे. बचतगटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी रूरल मार्टच्या माध्यमातून हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. रु लर मार्टच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाला आणखी चालना मिळण्यास मदत झाली असल्याचे प्रतिपादन महिला व बाल विकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी केले.
येथील सिव्हील लाईन्स परिसरातील राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्डच्या सहायाने महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालयाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या रूरल मार्टच्या उद्घाटनप्रसंगी बुधवारी (दि.२९) त्या बोलत होत्या. याप्रसंगी आमदार सहसराम कोरोटे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नीरज जागरे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे प्रामुख्याने उपस्थित होते. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्राचे पूजन करण्यात आले. पुढे बोलताना ठाकूर यांनी, महिला संघटित झाल्यामुळे त्या वस्तू आणि साहित्याची निर्मिती करू लागल्या आहेत. बचतगटातील महिला भगिनींना बळकट करण्याचे काम महिला व बालविकास विभाग निश्चितपणे करेल असा विश्वास व्यक्त केला. तसेच महिलांमध्ये अनेक नवनवीन संकल्पना आहे. त्या प्रत्यक्षात उतरविण्याचे काम महिलांनी करावे, यासाठी त्यांना निश्चितपणे मदत करण्यात येईल. कुटुंबाच्या अर्थकारणात महिलांचा हातभार लागत असल्याचेही त्या म्हणाल्या.
रूरल मार्टमध्ये गोंदिया, सालेकसा, तिरोडा, देवरी, आमगाव, गोरेगाव व सडक-अर्जुनी तालुक्यातील ५४ महिला बचतगटांनी तयार केलेल्या ७५ प्रकारच्या विविध वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहे. यामध्ये विविध शोभिवंत लाकडी वस्तू, बांबू आर्ट, गोंडी पेंटिंग, मायक्रोन वस्तू, कापडी बॅग, कापडी मास्क, पायदान, बांगड्या, विविध प्रकारची लोणची,पापड, कुरड्या, चकल्या तसेच विविध प्रकारच्या डाळीं यासह अनेक वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
कार्यक्रमासाठी सहायक जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्कंड, सनियंत्रण अधिकारी प्रदीप कुकडकर, लेखाधिकारी योगेश वैरागडे, जिल्हा उपजीविका व्यवस्थापक हेमंत मेश्राम, राम सोनवणे, प्रफुल अवघड, उत्कर्ष लोकसंचालित साधन केंद्राच्या व्यवस्थापक मोनिता चौधरी तसेच तालुका अभियान कक्ष तिरोडा आणि सालेकसा येथील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
वस्तूंची पाहणी व खरेदीही केली
याप्रसंगी नामदार ठाकूर यांनी रूरल मार्टमध्ये विक्र ीसाठी उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या वस्तू आणि साहित्याची पाहणी केली. कापडी मास्क तयार करणाºया बचतगटातील महिला तसेच अन्य साहित्य निर्मिती करणाºया महिलांशी त्यांनी संवाद साधला. तसेच काही वस्तूंची खरेदी करून नोंदणी वहीत त्यांनी आपला अभिप्रायही नोंदविला.