स्वयंपाकीन महिलांचा किमान वेतनावर पूर्ण अधिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 09:09 PM2018-11-04T21:09:02+5:302018-11-04T21:09:24+5:30

कॉँग्रेस सरकारने देशातील प्रत्येक कामगारांच्या हितांना सुरक्षीत ठेवण्यासाठी किमान वेतन लागू केले आहे. त्यानुसार स्वयंपाकीन महिलांचाही किमान वेतनावर पूर्ण अधिकार असून त्यांच्या या न्याय्य मागण्यांसाठी सरकारच्या प्रत्येक मंचावर प्रयत्न करू असे आश्वासन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी दिले.

Women with full control of the minimum wages of self-made women | स्वयंपाकीन महिलांचा किमान वेतनावर पूर्ण अधिकार

स्वयंपाकीन महिलांचा किमान वेतनावर पूर्ण अधिकार

googlenewsNext
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : स्वयंपाकीन महिलांच्या आंदोलन मंडपाला दिली भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कॉँग्रेस सरकारने देशातील प्रत्येक कामगारांच्या हितांना सुरक्षीत ठेवण्यासाठी किमान वेतन लागू केले आहे. त्यानुसार स्वयंपाकीन महिलांचाही किमान वेतनावर पूर्ण अधिकार असून त्यांच्या या न्याय्य मागण्यांसाठी सरकारच्या प्रत्येक मंचावर प्रयत्न करू असे आश्वासन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी दिले.
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद-नगर परिषद-महानगरपालिका शाळा स्वयंपाकीन महिला संघाच्यावतीने जिल्हाध्यक्ष चंदा दमाहे यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलन मंडपात शनिवारी (दि.३) भेट दिली असता ते उपस्थित स्वयंपाकीन महिलांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
स्वयंपाकीन महिलांना किमान वेतन लागू करा, स्थायी शासकीय सेवेते समाविष्ट करा, विद्यार्थी संख्या कमी झाली तरीही कार्यरत स्वयंपाकीन महिलांना अन्य शाळांत समायोजीत करा, १० महिने ऐवजी १२ महिने नियमित वेतन द्या, दिवाळी बघता मागील ६-८ महिन्यांपासून थकीत वेतन द्या या मागण्यांसाठी मागील १५ दिवसांपासून स्वयंपाकीन महिलांचे जिल्हा परिषद समोर आंदोलन सुरू आहे.
आमदार अग्रवाल यांनी भेट दिली असता त्याप्रसंगी संघाच्या विदर्भ विभाग प्रमुख ज्योती लांडगे, जिल्हा कार्याध्यक्ष मनोज दमाहे, तालुकाध्यक्ष शिवनाथ खरोले, प्रमिला राऊत, प्रतिभा बडगे, सुनिता पाऊलझगडे, गीता सोनवाने, भोजराम वाढई, सरिता उके यांच्यासह मोठ्या संख्येत स्वयंपाकीन महिला उपस्थित होत्या.
आमदारांना दिले मागण्यांचे निवेदन
आमदार अग्रवाल यांनी आंदोलन मंडपाला भेट दिली असता संघाच्या अध्यक्ष दमाहे यांनी त्यांना संघाच्या मागण्यांबाबत माहिती देत चर्चा केली. तसेच मागण्यांचे निवेदन आमदारांना दिले. आमदारांनी त्यांच्या मागण्या व परिस्थिती जाणून घेत मागण्यांच्या पूर्ततेसाठी संभव ते प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

Web Title: Women with full control of the minimum wages of self-made women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.