महिलांनो संघटित व्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 10:32 PM2018-01-27T22:32:35+5:302018-01-27T22:33:33+5:30
पुरूषांच्या बरोबरीने महिला आज काम करीत आहेत. तरीही त्यांच्यावरील अत्याचार सुरूच आहे. यासाठी आता महिलांनी संघटीत होऊन महिला शक्ती निर्माण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सविता पुराम यांनी केले.
आॅनलाईन लोकमत
सालेकसा : पुरूषांच्या बरोबरीने महिला आज काम करीत आहेत. तरीही त्यांच्यावरील अत्याचार सुरूच आहे. यासाठी आता महिलांनी संघटीत होऊन महिला शक्ती निर्माण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सविता पुराम यांनी केले.
भारतीय जनता पार्टी मंडळाच्यावतीने ग्राम हलबीटोला येथे आयोजीत महिला मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला महिला आघाडीच्या सुनंदा उईके, भाजपा महिला आघाडी अध्यक्ष कल्याणी कटरे, संगिता शहारे, पं.स. सदस्य प्रतिभा परिहार प्रामुख्याने उपस्थित होत्या. यात महिलांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या कार्यक्रमाप्रसंगी नवनियुक्त नगर पंचायत सालेकसा येथील नगराध्यक्ष विरेंद्र उईके यांचे शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. उपाध्यक्ष प्रल्हाद वाढई, उमेदलाल जैतवार, धनराज जंगेरे, बबीता कोडापे, पार्वता पंधरे, जानकी टेकाम, धनवंता कोटांगले, कुलवंता करकंडे, रविता वलथरे, मंगला चौधरी, डिलेश पारधी, सुनिता उईके, न.प. सदस्यांचे सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाला भाजपा महामंत्री राजेंद्र बडोले उपस्थित होते. संचालन प्रतिभा परिहार यांनी केले. प्रास्ताविक कल्याणी कटरे व आभार संगिता शहारे यांनी मानले.
महिला बचत गट
नवेगावबांध : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अंगणवाड्या, महिला बचत गट आणि स्थानिक ग्रामपंचायतच्या संयुक्तवतीने येथील ग्रामपंचायत सभागृहात महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रम घेण्यात आला.
उद्घाटन ग्रा.पं. सदस्य गुणीता डोंगरवार यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी शितल राऊत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच अनिरुद्ध शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार, ग्रामविकास अधिकारी पी.आर. चव्हाण, मुलचंद गुप्ता, शिल्पा तरोणे, ग्रा.पं. सदस्य लिला सांगोळकर, सविता बडोले, हर्षा बाळबुद्धे, अर्चना पंधरे, अनुसया नैताम, दुर्गा मेश्राम, लता आगाशे, भिमा शहारे, मनिषा तरोणे, रेखा झोडे, जासू कापगते उपस्थित होते.
कार्यक्रमाला ११ अंगणवाड्यांतील सेविका, मदतनिस, महिला बचत गटांचे पदाधिकारी व सदस्य तसेच ग्रामवासी महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. हळदी-कुंकू कार्यक्रमात विवाहित तरुण ते वृद्ध महिलांनी प्राचीन काळातील ते आधुनिक काळातील उखाण्यांनी कार्यक्रमात रंगत आणली. संचालन कांता डोंगरवार यांनी केले. प्रास्ताविक पुष्पा धार्मिक यांनी मांडले. आभार टीना कापगते यांनी मानले.
ग्रामपंचायत कार्यालय
सुकडी (डाकराम) : जवळील ग्राम ठाणेगाव येथील ग्रामपंचायतच्यावतीने ग्रामपंचायत कार्यालयात स्वच्छतामय संक्रांतीचे हळदीकुंकू कार्यक्रम घेण्यात आला. उद्घाटन सरपंच अनिता रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य प्रिती रहांगडाले होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच डुलेश्वरी शहारे, सदस्य पुष्पा खोब्रागडे, चारुशिला कनोजे, संगिता खोब्रागडे, मंगला खोब्रागडे, ग्रामसेविका परिहार, रसिकला चव्हाण, अंगणवाडी सेविका मिनाक्षी जांभुळकर व गावातील महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमात गावातील महिलांना सरपंच रहांगडाले यांच्या हस्ते हळदीकुंकू व वान देण्यात आले. संचालन उपसरपंच डुलेश्वरी शहारे यांनी केले. आभार पुष्पा खोब्रागडे यांनी मानले.
यावेळी गावातील महिला मोठ्या संख्येत उपस्थित होत्या.
पेरकी समाज
गोंदिया : महाराष्ट्र पेरकी समाज परिवर्तन सेवा संस्थेच्यावतीने स्रेह संमेलन व हळदीकुंकू कार्यक्रम बुधवारी (दि.२४) आयोजीत करण्यात आला होता. कार्यक्रमाला संघटनेचे उपाध्यक्ष संतोष अच्चेवार, संघटक सागर येंचिलवार, कोषाध्यक्ष रौनक अक्कलवार, सदस्य व मान्यवर उपस्थित होते. हळदीकुंकू कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छाया येंचिलवार होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून शोभा तामसेटवार, वर्षा अच्चेवार, लक्ष्मी सामृतवार, माया वन्नेवार उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी शारदा तामसेटवार, शांता चिंतनवार, सिंधू अक्कलवार, मंजुषा पेंडलेवार, विमला येंचिलवार, पिंकी पेंडलेवार, माधुरी तामसेटवार, वनिता येंचिलवार, मनु बातुलवार, प्रमिला येंचिलवार, सुरेखा तामसेटवार, शिल्पा तामसेटवार व समस्त महिला उपस्थित होत्या.