महिलांनी पकडली अवैध देशी दारू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2017 01:26 AM2017-06-09T01:26:56+5:302017-06-09T01:26:56+5:30

राजीवनगर (ताडगाव) येथे अवैध दारू विक्रेत्यास महिलांनी अवैध दारूसह पकडून पोलिसांच्या स्वाधिन केले.

Women indulge in illegal country liquor | महिलांनी पकडली अवैध देशी दारू

महिलांनी पकडली अवैध देशी दारू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी मोरगाव : राजीवनगर (ताडगाव) येथे अवैध दारू विक्रेत्यास महिलांनी अवैध दारूसह पकडून पोलिसांच्या स्वाधिन केले. ही घटना ६ जूनच्या दुपारी ३.४५ वाजता घडली. यात दारू विक्रेता दशरथ मारूती शहारे (४५) रा. राजीवनगर (ताडगाव) याच्या गुन्हा दाखल करण्यात आला.
राजीवनगर (ताडगाव) हे तंटामुक्त गाव असूनही येथे अवैधरित्या दारू विकली जात होती. त्यामुळे गावातील मोठ्या माणसांसह अल्पवयीन मुलेसुद्धा दारूच्या आहारी गेले होते. कुटुंबाच्या वाताहतीसह गावातील सामंजस्यसुद्धा धोक्यात आले होते. त्यामुळे येथील जागृत महिलांनी एल्गार पुकारून अवैध दारू विक्रेत्यासह एक हजार ४२५ रूपये किमतीचे ५७ देशी दारूचे पव्वे पकडले व लगेच अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यात महिला पोहोचल्या. पोलिसांनी तात्काळ दखल घेवून गुन्हा नोंद केला.

मोहफुलांची दारू विक्री करणाऱ्यांना अटक
तालुक्याच्या ईटखेडा येथे अवैधरित्या दारू विक्री करणारा मुनेश्वर टिकाराम बरैया (३३) रा. ईटखेडा याला एक हजार रूपये किमतीच्या १० लिटर मोहफुलांच्या दारूसह ४ जून रोजी पकडण्यात आले. तर दुसऱ्या घटनेत ६ जून रोजी रामकृष्ण विठोबार घोरमोडे रा. ईटखेडा यालाही ३०० रूपये किमतीच्या तीन लिटर मोहफुलांच्या दारूसह पकडण्यात आले. ही कारवाई पोलीस हवालदार मनोहर बुराडे व आनंद इस्कापे यांनी केली.

Web Title: Women indulge in illegal country liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.