माकडांच्या हल्ल्यात महिला जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2017 12:56 AM2017-05-23T00:56:45+5:302017-05-23T00:56:45+5:30

साखरीटोला परिसरात पागल झालेल्या माकडांचा कहर सुरुच असून माकडांच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.

Women injured in Monkey attack | माकडांच्या हल्ल्यात महिला जखमी

माकडांच्या हल्ल्यात महिला जखमी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
साखरीटोला : साखरीटोला परिसरात पागल झालेल्या माकडांचा कहर सुरुच असून माकडांच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. मात्र वनविभागाचे अधिकारी निद्रावस्थेत आहेत. आतापर्यंत त्या माकडाचा बंदोबस्त करण्यात वनविभाग अपयशी ठरला आहे. अजून किती लोकांना त्या माकडांच्या हल्ल्याला सामोरे जावे लागेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वनविभाग नागरिकांच्या मरणाची वाट पाहत आहे काय? असा प्रश्न नागरिकांनी विचारला आहे.
१८ मे रोजी सलंगटोला येथील मोहपत कुशन मुनेश्वर यांचा माकडाने चावा घेवून गंभीर जखमी केले होते. ते सध्या नागपूरला उपचार घेत आहेत. ही घटना ताजी असतानाच २२ मे रोजी सकाळी ६ वाजताच्या दरम्यान साखरीटोला (सातगाव) येथील विठा काशीनाथ दोनोडे (५५) या महिलेला घराच्या मागील भागात अचानक माकडाच्या हल्ल्याचा सामना करावा लागला.
झाडू घेवून साफसफाई करीत असताना माकडाने त्यांच्या अंगावर उडी घेवून मानेच्या लचका तोडला व गंभीर जखमी केले. लगेच त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र सातगाव येथे भरती करण्यात आले. येथून त्यांना रेफर टू गोंदिया करण्यात आले. १०८ क्रमांकाच्या गाडीने त्यांना गोंदियाला पुढील उपचाराकरिता नेण्यात आले.
या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. यापूर्वी सुद्धा हेटीटोला येथील माजी सरपंच प्रमिला बागळे, सलंगटोला येथील पाच ते सहा लोकांना व साखरीटोला येथे तीन ते चार घटना घडल्या. मात्र अजूनही माकडांचा बंदोबस्त विभाग करू शकला नाही व कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई देऊ शकला नाही. यासाठी वनविभागाचे अधिकारी कारणीभूत आहेत.
साखरीटोला येथे वनविभागाचे बिट कार्यालय आहे. बरेचदा ते बंद असते. येथील बिटरक्षक एस.जी. बुंदेले हे गोंदियावरुन अपडाऊन करतात. मुख्यालयी ते राहत नाही. त्यामुळे आपल्या बिटकडे दुर्लक्ष असते. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी व नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी, अशी मागणी निलकंठ दोनोडे यांनी केली आहे.

Web Title: Women injured in Monkey attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.