स्रीयांना स्वतंत्र विचार आणि व्यक्तीमत्वाची आवश्यकता (महिला)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:29 AM2021-03-10T04:29:43+5:302021-03-10T04:29:43+5:30

- जयश्री पुंडकर : जागतिक महिला दिन कार्यक्रम आमगाव : आता काही संदेह नाही की पुरुषांच्या सोबतच स्त्रियांनीही फार ...

Women need independent thinking and personality (women) | स्रीयांना स्वतंत्र विचार आणि व्यक्तीमत्वाची आवश्यकता (महिला)

स्रीयांना स्वतंत्र विचार आणि व्यक्तीमत्वाची आवश्यकता (महिला)

googlenewsNext

- जयश्री पुंडकर : जागतिक महिला दिन कार्यक्रम

आमगाव : आता काही संदेह नाही की पुरुषांच्या सोबतच स्त्रियांनीही फार मोठे अंतर पार केले आहे. आता त्यांनी मानसिक मजबुती, विचाराने सुदृढता व सोबतच आर्थिक स्वतंत्र्यही प्राप्त केले आहे. स्त्रीला शालीनतेच्या सोबतच स्वतंत्र विचार, स्वतंत्र व्यक्तिमत्व आणि थोड्या आक्रमकतेची गरज आहे. स्त्रियांचे जीवन कसे हवे हे ठरविण्याचे अधिकार फक्त स्त्रियांना हवे इतरांना नको असे प्रतिपादन जयश्री पुंडकर यांनी केले.

जागतिक महिला दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा पठाडे, मिना फुल्लुके, देवीका उके, यशोदा नाईक, सत्यशिला छिपे, रामकला उके, पुराम, ग्रामीण रुग्णालयातील डॉ. मृणाली उपराडे, डॉ. सुखपती उपराडे, डॉ. मुदृला टावरी, स्नेहा गुप्ता, दमयंती उपवंशी, तहसील कार्यालयातील छाया रहांगडाले, चंद्रकला पुंडकर, बहेकार, के.डी.भदोरीया, मंजुशा उके, तायडे, अंबादे, मेश्राम उपस्थित होते. याप्रसंगी त्यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Women need independent thinking and personality (women)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.