महिलांनी पुरुषप्रधान मानसिकतेतून बाहेर पडणे काळाची गरज ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:27 AM2021-03-15T04:27:16+5:302021-03-15T04:27:16+5:30
देवरी : स्त्रीला आपल्या देशात देवीचा दर्जा प्राप्त आहे. घरच्या सर्व आवश्यकता व दु:खाचे निराकरण करीत आपल्या घरासह समाज ...
देवरी : स्त्रीला आपल्या देशात देवीचा दर्जा प्राप्त आहे. घरच्या सर्व आवश्यकता व दु:खाचे निराकरण करीत आपल्या घरासह समाज व विश्वाची निर्मिती व पालन करते. महिलांना वेदना तेव्हा होतात जेव्हा त्यांच्या स्वतंत्रता, शिक्षण व राजकीय आत्मसन्मानावर प्रहार होतो. आजही महिलांकडे पुरुषप्रधान मानसिकतेमुळे डोळेझाक केली जाते. अशा पुरुषप्रधान मानसिकतेतून महिलांनी बाहेर पडणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ता सीमा सहषराम कोरोटे यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमित्त शनिवारी (दि.१३) आयोजित कोरोना काळात कोरोना योध्दा म्हणून समाजात काम करणाऱ्या महिलांच्या सत्कार सोहळ्यात मार्गदर्शन करताना अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. उद्घाटन जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष उषा शहारे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष सुभद्रा अगडे, कला सरोटे, कल्पना बागडे, उज्ज्वला कोचे, सीमा भोयर, समिना कुरैशी, रिना बावनथडे, चंद्रकला भोयर, अनिता पंधरे, प्रभा बहेकार, छाया मडावी, अनवंता आचले, निर्मला मडावी प्रामुख्याने उपस्थित होत्या.
पुढे बोलताना कोरोटे यांनी, आज महिला राजकारण, समाजसेवा, शिक्षण, खेळ, विज्ञान व सर्व प्रशासकीय सेवेत पुरुषांच्या बरोबरीने किंवा त्यांच्यापेक्षा जास्त नावलौकिक करीत आहेत. ही आम्हा सर्वासाठी सन्मान व गर्वाची बाब आहे. महिलांसाठी काही विशेष दर्जा नको. परंतु महिलांना उपभोगाची वस्तू न समजता समाजात राजकारण व शिक्षण क्षेत्रात सन्मान मिळायला पाहिजे असे मत व्यक्त केले. संचालन तारा टेंभुर्णेकर यांनी केले. आभार किरण राऊत यांनी मानले. कार्यक्रमाला तालुका व शहर महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येत उपस्थित होत्या.
-----------------
या कोरोना योेद्धांचा केला सत्कार
कार्यक्रमाला उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते कोरोना योध्दाच्या रुपात कार्य करणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील पूजा डोये, पुष्पा धुर्वे, आशा वर्कर रविता कोटांगले, महिला पोलीस शिपाई गीता मेंढे व रेशमा सोंजाळ, घरकाम करणाऱ्या शामकला राऊत यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.