विकासात महिलांची महत्त्वाची भूमिका

By admin | Published: June 17, 2017 12:24 AM2017-06-17T00:24:20+5:302017-06-17T00:24:20+5:30

केंद्र तसेच राज्य सरकार समाजाच्या प्रत्येक घटकासाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करीत असून या योजनांच्या यशस्वीतेमध्ये महिलांचे मोठे योगदान आहे.

Women play an important role in the development | विकासात महिलांची महत्त्वाची भूमिका

विकासात महिलांची महत्त्वाची भूमिका

Next

उषा मेंढे यांचे प्रतिपादन : विशेष प्रचार अभियानाचे उद्घाटन
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : केंद्र तसेच राज्य सरकार समाजाच्या प्रत्येक घटकासाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करीत असून या योजनांच्या यशस्वीतेमध्ये महिलांचे मोठे योगदान आहे. देशाच्या सकारात्मक विकासामध्ये महिलांची महत्त्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे यांनी केले.
लगतच्या ग्राम कुडवा येथे भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या क्षेत्रीय प्रचार कार्यालयाच्यावतीने गुरूवारी (दि.१५) विविध योजनांच्या प्रचारार्थ आयोजित विशेष प्रचार अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती माधूरी हरीणखेडे, जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख, गट विकास अधिकारी एस.व्ही.इस्कापे, तालुका आरोग्य अधिकारी वेदप्रकाश चौरागडे, कुडवाचे सरपंच शैलेंद्र वासनिक, जिल्हा परिषदेच्या सदस्य खुशबू टेंभरे, पंचायत समिती सदस्य किर्ती पटले, बँक आॅफ इंडियाचे व्यवस्थापक अनिल कुमार, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक राणे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
पुढे बोलताना मेंढे यांनी, महिला आज प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे. आज महिला ही अबला नसून देशाच्या विकासात महिलांचे मोठे योगदान आहे. देशाच्या आणि स्वत:चा विकास साध्य करण्यासाठी महिलांनी विकासाच्या या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. बँक आॅफ इंडियाचे व्यवस्थापक अनिल कुमार यांनी, जनधन तसेच, विमा योजनाबद्दल माहिती देत, आज बँकेमार्फत एकूण ५३ योजना राबविण्यात येत असून या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येकांनी आपल्या बँक खात्यासोबत आधार क्रमांक लिंक करण्याचे आवाहन केले.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे यांनी, ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ बाबत बोलतांना सन १९५१ मध्ये पहिल्या जनगणनेने दर एक हजारी पुरुषामागे ९५६ महिला असे प्रमाण होते. हे आज ९१८ असे आहे. ही तफावत दुर करण्यासाठी ‘बेटी बचाआ-बेटी पढाओ’ ही योजना राबविण्यात येत असून स्त्री भ्रूणहत्या थांबविण्यावर त्यांनी भर दिला. स्वच्छ भारत अभियानाबाबत बोलतांना उपमुख्य कार्यपालन अधिकारी देशमुख यांनी स्वच्छ भारत अभियानाबाबत सर्वांनी सक्र ीय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
या विशेष प्रचार अभियानाची सुरु वात योग प्रात्यिक्षकेने करण्यात आली. आर्ट आॅफ लिव्हींगचे राष्ट्रीय योग प्रशिक्षक समीर उपाध्याय यांनी योगाबाबत माहिती देऊन योगाबाबतचे प्रात्यिक्षिक करुन दाखिवले. यात उपस्थितांनी सहभाग घेतला. प्रास्ताविक नागपूरचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी मनोज सोनवने यांनी मांडले.

जनजागृती रॅली काढली
विशेष प्रचार अभियानानिमित्त सकाळी जनजागृती रॅली काढण्यात आली होती. सरपंच वासनिक यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला रवाना केले. या रॅलीत महिला मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या. विशेष प्रचार अभियानाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. विभागाच्यावतीने प्रदर्शनी लावण्यात आली होती. यामध्ये बँक आॅफ इंडिया, आरोग्य विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, स्वच्छ भारत मिशन आदींनी आपल्या योजनांबाबत माहिती दिली.

 

Web Title: Women play an important role in the development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.