महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 01:02 AM2018-08-08T01:02:14+5:302018-08-08T01:02:55+5:30

महिला आर्थिक विकास महामंडळ बचतगटाच्या माध्यमातून महिलांना विकासाच्या प्रवाहात आणीत आहे. त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे माविमच्या माध्यमातून महिलांनी आर्थिकदृष्टया सक्षम व्हावे.

 Women should be economically capable | महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे

महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे

Next
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : महिला बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करुन देणार, विविध योजनांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महिला आर्थिक विकास महामंडळ बचतगटाच्या माध्यमातून महिलांना विकासाच्या प्रवाहात आणीत आहे. त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे माविमच्या माध्यमातून महिलांनी आर्थिकदृष्टया सक्षम व्हावे. असे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी येथे केले.
शनिवारी येथील जलाराम लॉन येथे आयोजित महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हास्तरीय प्रधानमंत्री मुद्रा योजना समन्वय समिती आणि नियोजन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गोंदिया तालुक्यातील माविमच्या बचतगटातील महिलांसाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना महिला कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्षा सीमा मडावी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. शिक्षण व आरोग्य समिती सभापती रमेश अंबुले, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती शैलजा सोनवाने, महिला व बालकल्याण समिती सभापती लता दोनोडे, पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, जि.प.सदस्य रजनी गौतम, नगरसेविका भावना कदम, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, अग्रणी जिल्हा बँक व्यवस्थापक दिलीप सिल्लारे, जिल्हा उद्योग केंद्राचे प्रभारी व्यवस्थापक बी.एम.शिवणकर, कृषी विज्ञान केंद्र हिवराचे कार्यक्र म व्यवस्थापक डॉ. नरेंद्र देशमुख, तहसीलदार टी.आर.भंडारी, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सविता बेदरकर, राज्य महिला आयोगाच्या जिल्हा समन्वयक रजनी रामटेके उपस्थिती होत्या.
अग्रवाल म्हणाले, महिला आर्थिक विकास महामंडळ बचतगटाच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर करुन त्यांना सक्षम करण्याचे काम करीत आहे. महिला या कर्जाची परतफेड प्रामाणकिपणे करतात. बचतगटाच्या माध्यमातून महिलांनी उत्पादीत केलेल्या वस्तुला विक्री केंद्रासाठी एक चांगला मॉल तयार करण्याच्या दृष्टीने माविमची स्वतंत्र इमारत तयार व्हावी. तसेच महिला बचतगटाने उत्पादीत केलेल्या वस्तुला बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यास आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. जि.प.अध्यक्षा सीमा मडावी, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक सिल्हारे, उपविभागीय अधिकारी वालस्कर यांनी यावेळी मार्गदर्शन केले. या वेळी प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत बँक आॅफ महाराष्ट्र, बँक आॅफ बडोदा व बँक आॅफ इंडिया मार्फत बचतगटाच्या २० माहिलांना कर्ज प्रकरणाचे मंजुरीपत्राचे वाटप करण्यात आले. उपस्थित अन्य मान्यवरांनी या वेळी महिलांना मार्गदर्शन केले. या वेळी ‘उडाण उत्कर्षाची’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यशस्वीतेसाठी सनियंत्रण अधिकारी प्रदीप कुकडकर, लेखाधिकारी योगेश वैरागडे, सहायक प्रफुल्ल अवघड, एकांत वरघने, प्रिया बेलेकर व महिला बचतगटाच्या सहयोगिनी यांनी सहकार्य केले.
उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांचा गौरव
गाव निर्मल करण्यात मोलाचे सहकार्य केल्याबद्दल उत्कृष्ट ग्रामसंस्था म्हणून इंदिरा ग्रामसंस्था एकोडी, जिज्ञासा ग्रामसंस्था सेजगावच्या पदाधिकारी व सदस्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पैकनटोलीला ५० हजारांचा निधी
दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानअंतर्गत सुप्रभात वस्तीस्तरीय संघ पैकनटोली यांना फिरता निधी म्हणून ५० हजार रुपयांचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आला. तसेच उज्वला गॅस योजनेअंतर्गत ५ महिलांना गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले.

Web Title:  Women should be economically capable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.