महिलांना सन्मान मिळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:32 AM2021-03-09T04:32:11+5:302021-03-09T04:32:11+5:30
इसापूर : प्रचलित समाज व्यवस्थेविरुद्ध जगाच्या पाठीवरील कामगार महिलांनी असमानतेविरुद्ध बंड पुकारून महिलांच्या हक्कासाठी लढा दिला व ...
इसापूर : प्रचलित समाज व्यवस्थेविरुद्ध जगाच्या पाठीवरील कामगार महिलांनी असमानतेविरुद्ध बंड पुकारून महिलांच्या हक्कासाठी लढा दिला व सन्मानपूर्वक वागणुकीची अपेक्षा केली ती रास्त आहे. कारण महिलासुद्धा समाजाचा अविभाज्य अंग असून, त्यांना सन्मान मिळायलाच पाहिजे, असे प्रतिपादन उच्च श्रेणी मुख्याध्यापिका रेखा गोंडाणे यांनी केले.
मोरगाव येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमात त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून अचला कापगते-झोळे, प्राची कागणे-ठाकूर, पदवीधर शिक्षक सु.मो.भैसारे, जे.एन.ठवकर, मोहन नाईक, वामन घरतकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी शाळेच्यावतीने गोंडाणे, कागणे व कापगते यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकातून भैसारे यांनी जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांचे समाजातील स्थान यावर प्रकाश टाकला, तसेच मानव समाजाला प्रगती पथावर नेण्यासाठी महिलांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे मत मांडले. संचालन पुरुषोत्तम गहाने यांनी केले. आभार नाईक यांनी मानले. कार्यक्रमासाठी नगमा शहारे, मुक्ताई लोदी, मनीषा चाचेरे, हिना जनबंधू, पूनम नेवारे, राकेश नवरंग आदींनी सहकार्य केले.