महिलांनी बचत गटातून आर्थिक विकास साधावा
By admin | Published: February 14, 2017 01:06 AM2017-02-14T01:06:49+5:302017-02-14T01:06:49+5:30
महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक विकासासोबतच गाव विकासाकडेही लक्ष द्यावे, ...
उमाकांत ढेंगे : ग्राम संघ कार्यालयाचे उद्घाटन
इसापूर : महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक विकासासोबतच गाव विकासाकडेही लक्ष द्यावे, शासन सर्वोत्तोपरी महिलांच्या बचत गटांकडे लक्ष देऊन गटांच्या माध्यमातून मदत करीत आहे. गोरगरीब जनतेला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही शासनाची चळवळ असून त्याचा सदूपयोग करावा असे प्रतिपादन भाजपाचे अर्जुनी-मोरगाव तालुकाध्यक्ष उमाकांत ढेंगे यांनी काढले.
इसापूर येथील ग्राम संघ कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाला अतिथी म्हणून अर्जुनी-मोरगाव तालुका अभियान व्यवस्थापक प्रकाश फुलकुवर, सी.आर.शहारे, संतोष रोकडे, डिलेश्वर चांदेवार, सुनीता गेडाम, श्वेता रंगारी, विद्या गेडाम, रामकला लांजेवार, गिता येरणे, सूचीता ठवरे, संघ अध्यक्ष छाया बडवाईक उपस्थित होते.
याप्रसंगी प्रकाश फुलकुवर यांनी अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील बचत गटांच्या ग्रामसंघाच्या माध्यमातून बँक कर्ज देत असते. हे कर्ज शून्य व्याजदराने मिळते. गुंतवणूकीच्या १० पट बँक विना व्याजदराने कर्ज देते. समोरील काळात ग्रामसंघाना निधी येणार आहे. ग्रामसंघामार्फत गटांना पैसे मिळतील त्यासाठी ग्रामसंघ बळकटीकरणाची गरज असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इसापूर येथील सर्व महिला बचत गटातील सदस्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)