महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी
By admin | Published: April 10, 2015 01:27 AM2015-04-10T01:27:11+5:302015-04-10T01:27:11+5:30
दैनिक आहारावर लक्ष न दिल्याने, पौष्टीक आहाराअभावी व वेळेवर जेवण न केल्याने महिलांना आरोग्यासंबंधी त्रासांच सामना करावा लागतो.
आमगाव : दैनिक आहारावर लक्ष न दिल्याने, पौष्टीक आहाराअभावी व वेळेवर जेवण न केल्याने महिलांना आरोग्यासंबंधी त्रासांच सामना करावा लागतो. कॅल्शीयम व हिमोग्लोबीनच्या कमतरतेमुळे रक्तदाब, थकवा व वजनात कमी आदि त्रास उद्भवतात. महिला स्वस्थ राहिल्या तरच परिवार स्वस्थ राहणार. म्हणूनच महिलांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे, असे मत कटंगी (बालाघाट) येथून आलेल्या शोभा अग्रवाल यांनी व्यक्त केले.
लोकमत सखी मंचच्यावतीने येथील विद्यानिकेतन कॉन्व्हेंटमध्ये आयोजित आरोग्य विषयक मार्गदर्शन शिबिरात त्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. शिबिरात त्यांच्यासह विनोद बागडे व जी. मरठे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रार्थना गिताने या शिबिराला प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी शोभा शर्मा, अन्नू असाटी व गीता गुप्ता यांनी पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत केले. दरम्यान बागडे व मरठे यांनीही मार्गदर्शन केले. वर्षा शर्मा यांनी कार्यक्रमाचे संचालन करून आभार मानले. शिबिराला रूपम शर्मा, पूनम असाटी, किरण अग्रवाल, सीमा मोदी, माया असाटी, भावना कटकवार, किरण शर्मा, हिना चव्हाण, दिप्ती गोस्वामी, सरोज गोस्वामी, ज्योती अग्रवाल, कोमल अग्रवाल, निधी भक्तवर्ती, आरती असाटी, रेणू अग्रवाल, कविता अग्रवाल, प्रिती कटकवार, अनिता शुक्ला, रानू शुक्ला, गीता गुप्ता, माया गुप्ता, शिब्बो गुप्ता, प्रभा माहेश्वरी, सीमा तिवारी, निशा दुबे, उषा शर्मा, ममता असाटी, राधा अग्रवाल, अनुराधा असाटी, प्रियंका असाटी, छाया असाटी, ज्योती बोरकर, सुनिता गौतम, द्रौपदी गौतमसह मोठ्या संख्येत सखी उपस्थित होत्या. (शहर प्रतिनिधी)