रोवा वं बाई रोवण्या रोवा.. संध्याकाळी पाटलाघरच्या घुगऱ्या खावा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 03:48 PM2020-07-14T15:48:58+5:302020-07-14T15:51:21+5:30

रोवणी करणे म्हणजे शेतकरी वर्गाचा एक सण असतो, कारण रोवणी करतांना धुरे-पारा मारणे, कोंटे काढणे, पुरुषांचे काम पऱ्हे काढणे, रोवणीच्या बांधीत नांगर व ट्रक्टरच्या सहाय्याने चिखल करणे तरच रोवणीची तयारी पूर्ण होते.

women singing a song on farming season | रोवा वं बाई रोवण्या रोवा.. संध्याकाळी पाटलाघरच्या घुगऱ्या खावा...

रोवा वं बाई रोवण्या रोवा.. संध्याकाळी पाटलाघरच्या घुगऱ्या खावा...

Next
ठळक मुद्देलोककला परंपरागत रोवणी बहरल्या...कथा,गीत व चुकटूले, मजूर रंगले आनंदात

मुन्नाभाई नंदागवळी
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: पूर्वीच्या काळात आणि आताच्या काळात फार तफावत दिसते, पण शेती करतांना मात्र परंपरा न विसरता लोककला जोपासत आजही कथा, गीत व चुटकूले सादर करुन मोठ्या आनंदाने रोवणी बहरल्या आहेत.

रोवणी करणे म्हणजे शेतकरी वर्गाचा एक सण असतो, कारण रोवणी करतांना धुरे-पारा मारणे, कोंटे काढणे, पुरुषांचे काम प-हे काढणे, रोवणीच्या बांधीत नांगर व ट्रक्टरच्या सहाय्याने चिखल करणे तरच रोवणीची तयारी पूर्ण होते.

मग जुन्या पिढीच्या वयस्क स्त्रिया मंडळी गाण्याच्या तालावर, रोमांचकारी राजा-राणीच्या पौराणिक, सामाजिक कथेच्या मांडणीद्वारे, हास्याचा कल्लोळ करणारे चुटकूले सादरीकरणातून रोवणीला बळ मिळते, रोवणीचा वेग वाढतो.

रोवा व बाई रोवणा रोवा,
संध्याकाळी पाटलाच्या घरच्या
घुग-या खावा ...

अशी झाडीपट्टीतील रोवणीची गाणी प्रसिध्द आहेत. सर्वच स्त्रिया एका सरळ रेषेत उभ्या राहून रोवणीला सुरूवात करतात. रोवणी हा आनंदाचा सोहळा मजूर वर्ग शेतात फुलवतात.

शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, पण अनेक अडचणी, समस्यांचा सामना करत आपले शेत राखतो, शेतात धानपिक लावतो अशातच रोवणीची मजा काही वेगळीच असते अनुभवणा-यांना तर न्यारीच...

रोवणीत वणकर, फणकर, नांग-या यांचा संगनमत साधून रोवण्या बहारदार करतात, शेवटच्या दिवशी तर रोवणी संपली की परंपरेने चिखल-माती खेळ खेळतात, रोवणीची पुजा करतात, एकमेकांना चिखल लावतात,

डफळीचा बाजा करुन शेतातून रॅली काढतात घरापर्यंत बैलाच्या जोडीला समोर करुन मागे मागे मजूर वर्ग गाणी म्हणत येत असतो, शेतकरी घरी आल्यावर भिंतीवर चिखलाने माणसांचे चित्र काढतात ही ओळख असते रोवणी संपूर्ण झाल्याची.
अशा प्रकारे आजही लोककला परंपरागत रोवणी परिसराच्या येरंडी बाराभाटी बोळदे कवठा डोंगरगाव देवलगाव सुकळी आदी गावात बहरल्याचे चित्र पाहावयास मिळते.

Web Title: women singing a song on farming season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती