महिला शोषण प्रतिबंध व निवारण कार्यशाळा
By admin | Published: March 3, 2017 01:28 AM2017-03-03T01:28:05+5:302017-03-03T01:28:05+5:30
धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य डॉ. अंजन नायडू यांचे मार्गदर्शनात कार्यस्थळी होणाऱ्या महिलांच्या लैंगिक
गोंदिया : धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य डॉ. अंजन नायडू यांचे मार्गदर्शनात कार्यस्थळी होणाऱ्या महिलांच्या लैंगिक शोषण प्रतिबंध व निवारण विषयावर कार्यशाळा घेण्यात आली.
अतिथी म्हणून सेवानिवृत्त शासकीय वकील अॅड. वीणा वाजपेयी, सविता तुरकर, कार्यशाळा समन्वयक डॉ. नरडे, डॉ. शीतल बॅनर्जी, डॉ. धारणा टेंभरे, डॉ. प्रीती नागपुरे उपस्थित होत्या.
प्रास्ताविकातून कार्यशाळेच्या उद्देशाची माहिती मांडत प्रा. नरडे यांनी महिला सुरक्षेचे महत्व सांगितले. अॅड. वीणा वाजपेयी यांनी महिला सुरक्षेचे अधिकार व त्यांची आवश्यकता यावर मार्गदर्शन करुन महिलांच्या शोषणासंबंधीच्या विविध अधिनियमांची माहिती दिली. तसेच विशाखा योजना अंतर्गत कायदा व्यवस्थेची माहिती देवून सतर्क व जागरुक राहण्याविषयी आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या समस्या, त्यांचे प्रश्न व शंकांचे समाधान केले.
एनजीओ सचिव सविता तुरकर यांनी सांगितले, संस्था सदैव महिलांच्या शोषणविरोधात प्रयत्नशील आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अग्रेसरही असते. मनोधैर्य योजनेसंबंधी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करुन त्या मोबदल्यात मिळणाऱ्या सोयींची व लाभांची माहिती दिली. संचालन मुस्कान शर्मा व अमिषा गुप्ता यांनी केले. आभार मधुमिता सिंग यांनी मानले.