विविध स्पर्धेतून महिलांचा कलाविष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 10:05 PM2017-10-02T22:05:29+5:302017-10-02T22:05:57+5:30

सार्वजनिक दुर्गा उत्सव समिती गोवारीटोला व सहा लोक संचालित केंद्रांतर्गत संस्कार ग्राम संस्था आणि देवी ग्राम संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ....

Women's art inventions from various events | विविध स्पर्धेतून महिलांचा कलाविष्कार

विविध स्पर्धेतून महिलांचा कलाविष्कार

Next
ठळक मुद्देबचत गटांचा पुढाकार : शेकडो महिलांनी घेतला सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : सार्वजनिक दुर्गा उत्सव समिती गोवारीटोला व सहा लोक संचालित केंद्रांतर्गत संस्कार ग्राम संस्था आणि देवी ग्राम संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बाजार चौक गोवारीटोला येथील प्रांगणात महिलांच्या विविध सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या. यात बचत गटातील महिलांनी त्यांच्यातील विविध कलागुणांचे सादरीकरण केले.
अध्यक्षस्थानी दुर्गा उत्सव समितीचे अध्यक्ष सुरेशकुमार मच्छिरके होते. मार्गदर्शक म्हणून महिला विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक सुनील सोसे, तालुका कार्यक्रम व्यवस्थापक अनिल गायकवाड, सहारा लोक साधन केंद्राचे व्यवस्थापक शालू साखरे, बद्रीप्रसाद दसरिया, एस.जे. वैद्य, नरेंद्र भेलावे, डॉ. धरन पटले, यादव नागपुरे, रविजय मोटघरे, गोपाल बनोठे, दालचंद मोहारे व इतर मान्यवर उपस्थित होते.
विविध सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत एकल नृत्य, समूह नृत्य, संगीत खुर्ची, दांडिया, गरबा, नाटक, लेझीम, रांगोळी स्पर्धा, गीत गायन स्पर्धा इत्यादी कार्यक्रमाची बहरदार मेजवानी देण्यात आली. कार्यक्रमामध्ये गोवारीटोला येथील एकूण अकरा बचत गट आणि कुणबीटोला येथील आठ बचत गटातील जवळपास दोनशे महिलांनी आपल्या आवडीनुसार कलागुणांना सादर केले. यावेळी महिलांनी आपले कुटुंबीय व गावकºयांसमक्ष दिलखुलासपणे कलाविष्कार सादर केले. या वेळी आयोजित विविध कार्यक्रमांचा उपस्थितांनी आनंद लुटला. शेवटी प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावणाºया स्पर्धकांना बक्षीस देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमासाठी छाया मोटघरे, रामकुवर नागपुरे, संतकला वैद्य, अनिता मच्छिरके, हेमलता मोहारे, कांता नागपुरे, ममता बोपचे, शीला मेश्राम आदींनी सहकार्य केले. संचालन हेमलता दुर्गेश वैद्य यांनी केले.
कार्यक्रमाचे आकर्षण
हेमलता वैद्य यांची गणेश वंदना, हागणदारी मुक्त गाव यावर शीला मेश्राम यांचे हास्य नाट्य आणि एककलनृत्य, अनया ग्रुपचे उडी उडी जाए या गाण्यावर दांडिया, भारती ग्रुपचे कान्हा रे थोडा सा प्यार दे या गीता गरबा विशेष आकर्षण ठरले.

Web Title: Women's art inventions from various events

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.