महिला कॉंग्रेसची सभा उत्साहात ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:29 AM2021-03-17T04:29:43+5:302021-03-17T04:29:43+5:30

कार्यक्रमाची सुरूवात सावित्रीबाईंच्या छायाचित्राचे पूजन करून करण्यात आली. याप्रसंगी महिला कॉंग्रेसकडून कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन सर्व महिलांना मास्क व ...

Women's Congress meeting in high spirits () | महिला कॉंग्रेसची सभा उत्साहात ()

महिला कॉंग्रेसची सभा उत्साहात ()

Next

कार्यक्रमाची सुरूवात सावित्रीबाईंच्या छायाचित्राचे पूजन करून करण्यात आली. याप्रसंगी महिला कॉंग्रेसकडून कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन सर्व महिलांना मास्क व सॅनिटायझर महिला दिनानिमित्त वाटप करण्यात आले. जिल्हा उपाध्यक्ष सरिता अंबुले, जिल्हा सचिव उषा भांडारकर, तालुका अध्यक्ष अनिता मुनेश्वर, शीला ताई व अन्य महिलांना पत्र देऊन महिला संघटन वाढेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. याप्रसंगी महिला जिल्हाध्यक्ष शहारे यांनी, सर्व तालुकाध्यक्षांना पक्ष बळकट करण्यासाठी ग्राम कमिटी तयार करण्यास सांगितले. प्रास्ताविक सरिता अंबुले यांनी मांडले. संचालन छबू उके यांनी केले. आभार शीला उईके यांनी मानले.

सभेला कला सरोटे, किरण राऊत, कल्पना बागडे, आशा टेंभूर्णे, प्रभा बहेकार, छाया मडावी, निर्मला मडावी, अर्चना कुंजाम, माहेश्वरी उईके, माया पटले, वैशाली बिसेन, सीमा डहाट, रेखा फुंडे यांच्यासह अन्य महिला उपस्थित होत्या.

Web Title: Women's Congress meeting in high spirits ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.