महिला काँग्रेसचे प्रोजेक्ट शक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 09:52 PM2018-07-23T21:52:24+5:302018-07-23T21:52:46+5:30
येथील भोला भवनात जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने प्रोजेक्ट शक्ती या उपक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्षा सीमा मडावी होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील भोला भवनात जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने प्रोजेक्ट शक्ती या उपक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्षा सीमा मडावी होत्या.
प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प.अध्यक्षा उषा मेंढे, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा उषा शहारे, महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे, पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, जि.प. सदस्य ज्योती वालदे, उषा भेंडारकर, प्रभादेवी उपराडे, गायत्री ईरले, पुनम रहांगडाले, रुबीना मोतीवाला, प्रज्ञा गणविर, सुषमा घरत, पंचशिला रामटेके, लता दोनोडे, जयतुरा चव्हाण, सरिता अंबुले, पं.स. सदस्य मीना पटले, छबू उके, स्रेहा गौतम, नगर पंचायत सभापती वंदना जांभुळकर, वंदना शहारे, वंदना काळे, ममता दुबे, बेबीनंदा चौरे, सरपंच कविता वालदे, माधुरी राऊत, छाया रंगारी, हेमलता हरिणखेडे, कविता मेंढे, रोहिणी रहांगडाले, रोसपाल शेट्टी, आशा टेंभुर्णे, सुदेक्षणा राऊत, मिनाक्षी विठ्ठले, रंजना भोईर, किरण हटवार, शिला उईके, शालीनी देशमुख, जयतुरा बावने, निशा उईके, पंचशिला रामटेके, प्रियंका हरिणखेडे, अरुणा बहेकार, स्नेहा गौतम उपस्थित होत्या. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, इंदिरा गांधी, राजीव गांधी व सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्राला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या वेळी जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष शहारे यांनी प्रास्ताविकातून प्रोजेक्ट शक्ती उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. काँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशातील महिलांसाठी प्रोजेक्ट शक्ती नावाने अनोखा उपक्रम सुरु केला आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना सन्मान मिळावा तसेच त्यांना विकासाच्या प्रवाहात सामावून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महिलांची मते जाणून घेण्याकरिता प्रोजेक्ट शक्ती हा उपक्रम राबविला जात असल्याची माहिती दिली. या उपक्रमात जिल्ह्यातील महिलांनी सहभाग घेवून या संधीचा लाभ घ्यावा, असे शहारे यांनी सांगितले. सीमा मडावी यांनी महिलांनी केवळ चूल आणि मूल या पुरतेच मर्यादित न राहता घराबाहेर पडून स्वत:चा आणि कुटुंबाचा विकास साधण्याचे आवाहन केले. उपस्थित अन्य मान्यवरांनी महिलांना मार्गदर्शन केले. संचालन सरिता अंबुले यांनी तर आभार ज्योती वालदे यांनी मानले.