आमगाव येथे महिला दिन साजरा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:28 AM2021-03-18T04:28:25+5:302021-03-18T04:28:25+5:30

उद्‌घाटन पीएसआय हिरपे यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रिया शरणागत, ॲड. रंजीता खोब्रागडे डॉ. भावना खांबाडकर तर ...

Women's Day celebrated at Amgaon () | आमगाव येथे महिला दिन साजरा ()

आमगाव येथे महिला दिन साजरा ()

Next

उद्‌घाटन पीएसआय हिरपे यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रिया शरणागत, ॲड. रंजीता खोब्रागडे डॉ. भावना खांबाडकर तर प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मी भुते, लेला ब्राम्हणकर, वंदना भालेकर, साधना बोरकर, वंदना प्रदिते, राधा बहेकार, सुरेखा देशकर, सुनंदा उके, उषा भांडारकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करुन करण्यात आली. यावेळी महिलांनी ‘इतनी शक्ती हमें देना दाता’ हे प्रार्थना गीत सादर केले. कार्यक्रमाचे संचालन श्रद्धा साखरे आणि प्रियंका डोंगरे यांनी केले. प्रास्ताविक सुनंदा हुमणे यांनी मांडले तर आभार ममता बन्सोडे यांनी मानले.

यावेळी श्रद्धा महिला बचत गटाच्या सचिव अरुण गोंडाणे, अध्यक्ष रश्मी पारवे, आणि समिती मंचच्या सदस्या मनिषा बागडे, वैशाली रामटेके यांनी गरजू होतकरु महिलांचा शाल देऊन सत्कार केला. याप्रसंगी श्रद्धा महिला बचत गट व सावित्री माई मंचच्या रेखा दमाहे, अनिता कटरे, गुड्डू रामटेके,संध्या कन्मवार, निशा कन्मवार, मनिषा उके, तोषिका पटले, संगीता मेश्राम, सुनंदा निरकरे, सुशील कुंभारे, ललीता लिल्हारे, अनिता टेंभुर्णीकर, मंगला झिंगारे, डिलेश्वरी फुंडे, रेखा फुंडे आदींनी सहभाग घेतला होता.

Web Title: Women's Day celebrated at Amgaon ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.