दारूबंदीसाठी महिलांचा ‘एल्गार’

By admin | Published: July 12, 2017 01:01 AM2017-07-12T01:01:51+5:302017-07-12T01:08:52+5:30

वडोदा गावात अवैध दारू विक्री बंद व्हावी

Women's Elgar | दारूबंदीसाठी महिलांचा ‘एल्गार’

दारूबंदीसाठी महिलांचा ‘एल्गार’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : दारू विक्री बंद करा, या आग्रही मागणीस्तव वडोदा येथील मातृशक्तीने एकवटत शहरातील मंगलगेट भागातून सालीपुरा स्थित ग्रामीण पोलीस स्टेशनवर नगराध्यक्ष अ‍ॅड.हरीश रावळ तथा भाराकाँ अध्यक्ष राजू पाटील यांच्या नेतृत्वात ११ जुलै रोजी दुपारी धडक देत पोलीस स्टेशन आवारात ठिय्या दिला.
वडोदा गावात अवैध दारू विक्री सुरू असून, याविरुद्ध गावातील महिलांनी आज एल्गार पुकारला. सदर दारू विक्री बंद व्हावी, यास्तव शहरातील मंगलगेट भागात एकत्रित येऊन येथून ग्रामीण पोलीस स्टेशनवर धडक देत ठिय्या आंदोलन केले.
या आंदोलनात नगराध्यक्ष अ‍ॅड.हरीश रावळ, राजू पाटीलसह वडोदा सरपंच वर्षा गायकवाड, मीरा घोडके, शालीनी गायकवाड, विद्या गायकवाड, जयश्री हिवरखेडे, बेबाताई तायडे, निर्मला रणित, अनसूया मोरे, भरत गायकवाड, बबन तायडे, दिलीप दाभाडे, सुनील बगाडे, गजानन ठोसर, शे.भिकन, संतोष घोडके, विलास हिवरखेडे, आनंद नाईक, राजू उखर्डे, सुनील भिसे तसेच इतर महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

Web Title: Women's Elgar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.