महिलांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी महिला मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 12:48 AM2018-03-21T00:48:52+5:302018-03-21T00:48:52+5:30

विविध कार्यक्रमांतून महिलांना स्वत:च्या कलागुण व कर्तृत्वाला दाखविण्याची संधी मिळते. सोबतच शासनाच्या विविध योजना तसेच महिलांच्या सुरक्षा व विकासासाठी अस्तित्वात असलेले कायदे व नियमांची माहिती मिळते.

 Women's gathering to create energy among women | महिलांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी महिला मेळावा

महिलांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी महिला मेळावा

Next
ठळक मुद्देसंजय पुराम : जिल्हा महिला मेळाव्यात मार्गदर्शन

ऑनलाईन लोकमत
साखरीटोला : विविध कार्यक्रमांतून महिलांना स्वत:च्या कलागुण व कर्तृत्वाला दाखविण्याची संधी मिळते. सोबतच शासनाच्या विविध योजना तसेच महिलांच्या सुरक्षा व विकासासाठी अस्तित्वात असलेले कायदे व नियमांची माहिती मिळते. करिता महिलांमध्ये एकप्रकारची ऊर्जा निर्माण करण्यासाठी महिला मेळावा आयोजीत करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार संजय पुराम यांनी केले.
जिल्हा महिला व बालविकास विभागाच्यावतीने सोमवारी (दि.१९) आयोजीत जिल्हास्तरीय महिला मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष उषा मेंढे, महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे, कृषी व पशुसंवर्धन सभापती शैलजा सोनवाने, पंचायत समिती सभापती अर्चना राऊत, जि.प. सदस्य जियालाल पंधरे, दुर्गा तिराले, देवराम वडगाये, विजय टेकाम, ललीता चौरागडे, ज्योती वालदे, उषा शहारे, पंचायत समिती उपसभापती दिलीप वाघमारे, सरपंच संगीता कुसराम, पं.स.सदस्य स्नेहा गौतम, इंद्र धावडे, ललीता बहेकार, गोंदियाच्या पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, खंडविकास अधिकारी ए.एस. खाडे, उपसरपंच पृथ्वीराज शिवणकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष सुनील अग्रवाल, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय वानखेडे, डॉ. शोभना सिंह, डॉ. सुषमा देशमुख, संजय दोनोडे, राजू काळे उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष मडावी यांनी, सावित्रीच्या पुण्याईनेच आम्हा महिलांना शिक्षणाची संधी मिळाली. तसेच माता जिजाऊने शिवबाला घडविले. तेव्हा प्रत्येक मातेने आपल्या मुलांवर योग्य संस्कार करुन घराघरात शिवबा घडवा, असे विचार व्यक्त केले. डॉ. वानखेडे यांनी मुलांचे पालन-पोषण व स्तनदा मातांनी घ्यावयाची काळजी तसेच कुपोषण यावर मार्गदर्शन केले. सभापती दोनोडे यांनी, हुंडा प्रथा, बालविवाह, कौटुंबिक हिंसाचार, स्त्रीभृणहत्या अशा विविध कायद्यांची जाणीव करुन दिली.
कार्यक्रमात महिला व मुलीसाठी विविध सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आले. यासोबत महिलांसाठी रांगोळी, हस्तकला, पाककला व सृदृढ बालक स्पर्धा घेण्यात आल्या. यातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.डी. पारखे यांनी मांडले.
संचालन बालविकास प्रकल्पाच्या रंजना गौर यांनी केले. आभार दोनोडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी विशाल भोसले, राजेश वाघ, प्रमोद मानकर, विनोद लोंढे, अमृत सरडे तसेच जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाला पालकमंत्र्याचा खो
महिला मेळावा जिल्हास्तरावरील होता. त्याचे नियोजित उद्घाटक पालकमंत्री राजकुमार बडोले होते. मात्र त्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली नाही. सोबतच विधान परिषदेचे आमदार परिणय फुके, आमदार विजय रहांगडाले यांनी सुद्धा कार्यक्रमाला दांडी मारली. तसेच शिक्षण व आरोग्य सभापती रमेश अंबुले हे ही गैरहजर होते. त्यामुळे मेळाव्यात याची चर्चा होती.

Web Title:  Women's gathering to create energy among women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.