सासू-सून संवाद स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By Admin | Published: July 1, 2014 11:33 PM2014-07-01T23:33:13+5:302014-07-01T23:33:13+5:30

लोकमत सखी मंचच्या वतीने स्थानिक रामदेवरा मंदिर परिसरात आयोजित ‘खूब जमेगी जोडी सास-बहू की’ स्पर्धेस मोठ्या संख्येने सखी मंचचे सदस्य व इतर महिलांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Women's spontaneous response to the mother-in-law dialogue competition | सासू-सून संवाद स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सासू-सून संवाद स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next

रंगली स्पर्धा महिलांची : शारदा व सुशीला चौरसिया प्रथम तर ज्योती व उमा द्वितीय
गोंदिया : लोकमत सखी मंचच्या वतीने स्थानिक रामदेवरा मंदिर परिसरात आयोजित ‘खूब जमेगी जोडी सास-बहू की’ स्पर्धेस मोठ्या संख्येने सखी मंचचे सदस्य व इतर महिलांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमात अतिथी म्हणून कल्पना पटेल, करूणा श्रीवास्तव, अ‍ॅड. नीलू मांढरे, सीमा डोये उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात अतिथींच्या हस्ते स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या छायाचित्रावर माल्यार्पण व दीप प्रज्ज्वलनाने झाली. कार्यक्रमाच्या सुरूवातीला एका लघू नाटिकेच्या माध्यमातून एक भारतीय सासू कशाप्रकारे आपल्या सुनेला नियंत्रणात ठेवते, याचे व्यंगात्मक शैलीत सादरीकरण करण्यात आले. या लघूनाटिकेला उपस्थितांनी उत्तम प्रतिसाद दिला.
नाटिकेत सासूच्या भूमिकेत रचना गुप्ता व सुनेच्या भूमिका सुरभी अग्रवाल यांनी साकारली. स्पर्धेत भाग घेणाऱ्या महिलांनी सुनेच्या विना घर खाली तर सासूच्या निवा अंगण खाली असल्याचा संदेश देत म्हणाले की, दोन्ही एक दुसऱ्याचे पूरक आहेत. स्पर्धेत भाग घेणाऱ्या सुनांनी आपल्या कलेने हे सिद्ध केले की, ते सासूंची किती काळजी करतात. तसेच सासूंची भूमिका साकारणाऱ्या महिलांनीसुद्धा आपल्या कलेने हे प्रदर्शित केले की तेसुद्धा आपली सून व मुलीमध्ये कसलाही भेद करीत नाही. स्पर्धेत एकूण सासू-सुनेच्या आठ जोड्यांनी भाग घेतला होता.
ही स्पर्धा विविध फेऱ्यांत पार पडली. पहिल्या फेरीत सासू व सुनेच्या वेशभुशेवर परीक्षकांद्वारे गुण देण्यात आले. यानंतर सासूद्वारे सुनेचा मेकअप करण्यासाठी सर्वांना १० मिनिटांची वेळ देण्यात आले होते. यात सहभागी सर्व स्पर्धक सासूंनी आपापल्या सुनांचा अत्यंत आकर्षक मेकअप करून त्यांना सजविले होते. पुढील फेरीत सासू व सुनेला मायक्रोवेव कुकिंग करावयाची होती. यात सासूंनी सुनांना आपली पसंत सांगितली व सुनांनी त्यांची पसंत लक्षात घेवून स्वादिष्ट भोजन तयार केले.
सुनांनी तयार केलेला उपमा व पुलावचा सर्व उपस्थितांनी आस्वाद घेतला. यानंतर सासू व सुनांना वेगवेगळे पाच प्रश्न विचारण्यात आले. सासूला सुनेबाबत व सुनेला सासूबाबत प्रश्न विचारण्यात आले. यानंतर सासू व सून दोघांना समोर बसवून परीक्षकांद्वारे त्यांना प्रश्न विचारण्यात आले. या फेरीत शारदा व सुशीला चौरसिया तसेच श्वेता व थमेश्वरी यांनी सर्व १० प्रश्नांची योग्य उत्तरे दिली. प्रीति व भगवती शर्मा यांनी नऊ प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली.
शेवटच्या फेरीत सासू व सुनेसाठी एक मिनिट गेम शो ठेवण्यात आले होते. यात सुनेला सासूच्या कमरेला लटकलेल्या मगात शिक्के घालावयाचे होते. यात शारदा चौरसिया अव्वल आली. यानंतर गीता डे व कल्पना पटेल यांनी उपस्थित सर्व महिलांना मायक्रोवेव कुकिंगचे प्रशिक्षण दिले. यात स्प्रिंग रोल, मोमो, नुडल्स, ढोकले तयार करणे शिकविण्यात आले.
सदर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक शारदा व सुशीला चौरसिया, द्वितीय क्रमांक ज्योती व उमा यांनी मिळविले. तर तृतीय क्रमांक प्रीति व भगवती शर्मा यांनी मिळविले. सर्व स्पर्धकांना अतिथींच्या हस्ते पुरस्कार वितरीत करण्यात आले. रचना गुप्ता व सुरभी अग्रवाल यांना लघूनाटिकेसाठी पुरस्कृत करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन रिंकिता मित्तल यांनी तर आभार लोकमत सखी मंचच्या जिल्हा संयोजिका दीपा भौमिक यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संतोष बिलोने व सखी मंचच्या सदस्यांनी सहकार्य केले.
उपस्थित सखींनी कार्यक्रमाची प्रशंशा करीत सासू-सून यासाखरीच ‘देवरानी-जेठानी’ यांच्या संबंधावर आधारित स्पर्धा घेण्याची मागणी केली. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)

Web Title: Women's spontaneous response to the mother-in-law dialogue competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.