राज्य उत्पादन शुल्कच्या कर्मचाऱ्यांना महिलांचा घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:24 AM2017-07-19T00:24:43+5:302017-07-19T00:24:43+5:30

श्रीनगर परिसरातील नागरी वसाहतीत बीयर बार करण्याच्या मागणीला घेऊन महिलांनी सोमवारी (ता.१७) राज्य उत्पादन शुल्क

Women's wage for employees of state excise duty | राज्य उत्पादन शुल्कच्या कर्मचाऱ्यांना महिलांचा घेराव

राज्य उत्पादन शुल्कच्या कर्मचाऱ्यांना महिलांचा घेराव

googlenewsNext

नागरी वसाहतीतील मराठा बीयर बारमधील प्रकरण : नगरसेविकेच्या नेतृत्वात एल्गार
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : श्रीनगर परिसरातील नागरी वसाहतीत बीयर बार करण्याच्या मागणीला घेऊन महिलांनी सोमवारी (ता.१७) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांना घेरावा घातला.
राज्य शासनाने काही दिवसांपूर्वीच राज्य व महामार्गावरील ५०० मीटरच्या आतील दारू दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला.या निर्णयाने शहरातील अनेक बीयर बार बंद झाले. काही संधीसाधूंनी अडगडीत पडलेल्या श्रीनगर परिसरातील नागरी वस्तीतील मराठा बीयर बारकडे मोर्चा वडविला. याला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिपूर्ण आशिर्वाद असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. बीयर बार बंद व्हावा यासाठी येथील महिलांनी वर्षभरापूर्वी मोर्चा काढला होता. पण त्याचे काहीच परिणाम झाले नाही. सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी शासकीय वाहन क्र मांक एम.एच.३५- डी- ५३९ ने दाखल झाले.हे कर्मचारी कारवाईसाठीे आल्याचा भास महिलांना झाला. मात्र हे कर्मचारीे बीयर बारमध्ये दारू पिताना आढल्याने महिलांचा राग अनावर झाला. व ते बार मधून बाहेर निघताच त्यांचा घेराव करून त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. या प्रकरणाची तक्रार नगरसेविका निर्मला मिश्रा व परिसरातील महिलांनी शहर पोलिस ठाण्यात केली आहे.
बीयर बार बंद व्हावे, यासाठी श्रीनगर परिसरातील महिलांनी यापूर्वी पाच ते सहा वेळा राज्य उत्पादन शुल्क विभाग, जिल्हा पोलिस अधिक्षकांना निवेदन दिले. मात्र या निवेदनाकडे कुणीही गांभीर्याने लक्ष न दिल्याचा आरोप महिलांचा आहे. राज्य शासनाने राज्य व महामार्गावरील बीयर व दारूच्या दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला. पण, यानंतर काही जण नागरी वसाहतीत बिअर बार उघडण्याचा प्रयन्न करित आहेत. त्याचा परिणाम महिलांना व विशेष करून शाळकरी विद्यार्थ्यांना भोगावे लागत आहे. या प्रकाराची माहिती त्वरित महिलांनी शहर पोलिस ठाण्यांचे पोलिस निरीक्षक मनोहर दाभाडे यांना दिली. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दाभाडे ही घटनास्थळी आपल्या ताफ्यासह दाखल झाले. दोन्ही पक्षांची समजूत काढून वाढलेला तणाव शांत केला. महिलांना दुस-या दिवशी शहर पोलिस ठाण्यात बोलाविले. पोलिस प्रशासन तक्र ारीच्या आधारावर संबंधित बियर बार वर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी कर्मचा-यांवर कारवाई करणार काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बीयर बार बंद करण्याचा महिलांचा निर्धार
श्रीनगर मालवीयवार्ड येथील नागरी वस्तीतील मराठा बीयर बार बंद करावा यासाठी महिलांचा लढा वर्षभरापासून सुरू आहे. काही झाले तरी बियर बार सुरू होऊ न देण्याचा निर्धार नगरसेविका निर्मला मिश्रा यांच्या नेतृत्वात पुष्पा दुबे, देवका सोनवाने, लक्ष्मी दियेवार, शुल्का यादव, बाली डहारे, सुनंदा क्षीेरसागर, पोर्णिमा चौबे, आशा ठाकरे, रेखा कनौजिया, विमला पिपरेवार, सुशीला क्षीरसागर, यशोदा पारधी, कविता वाधवानी, मीना वैद्य, बेबी तिडके, पूरवंता चौबे यासह परिसरातील महिलांनी केला आहे.

 

Web Title: Women's wage for employees of state excise duty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.