प्रफुल्ल पटेलांनी पाळला दिलेला शब्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:28 AM2021-04-18T04:28:37+5:302021-04-18T04:28:37+5:30

गोंदिया : गोंदिया-भंडारा या दोन्ही जिल्ह्यांत रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. हीच बाब लक्षात ...

The word given by Praful Patel | प्रफुल्ल पटेलांनी पाळला दिलेला शब्द

प्रफुल्ल पटेलांनी पाळला दिलेला शब्द

Next

गोंदिया : गोंदिया-भंडारा या दोन्ही जिल्ह्यांत रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. हीच बाब लक्षात घेत खा. प्रफुल्ल पटेल यांनी त्वरित कॅडिला कंपनीच्या मालकांशी चर्चा करून रेमडेसिविर इंजेक्शनचा स्टॉक उपलब्ध करून देण्यास सांगितले. त्यानंतर दोन्ही जिल्ह्यांसाठी रेमडेसिविरच दोन हजार इंजेक्शन शनिवारी उपलब्ध करून देण्यात आली असून, खा. प्रफुल्ल पटेल यांनी दिलेला शब्द पाळला.

खा. प्रफुल्ल पटेल यांनी गोंदिया आणि भंडारा या दोन्ही जिल्ह्यांसाठी प्रत्येकी एक हजार रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून दिली. तसेच रुग्णांना हे इंजेक्शन शासनाने निर्धारित केलेल्या दरातच उपलब्ध करून देण्याचे निर्देश आहेत. तसेच यानंतरही रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होणार असून, जुबलीयंट कंपनीनेसुद्धा इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. सन फार्माने ४ रुग्णालयांना ४०० इंजेक्शनचा पुरवठा खा. प्रफुल्ल पटेल यांच्या चर्चेनंतर केला आहे. गोंदिया आणि भंडार जिल्ह्यात सुद्धा रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी गोरगरीब आणि सामान्य रुग्णांची परवड होत आहे. हीच बाब लक्षात घेत खा. प्रफुल्ल पटेल यांनी कॅडिला कंपनीच्या मालकांशी चर्चा करून रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यास सांगितले. त्यानंतर या कंपनीने दोन्ही जिल्ह्यांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून दिले आहे. विशेष म्हणजे माजी आ. राजेंद्र जैन यांनीसुद्धा जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला असल्याची बाब खा. प्रफुल्ल पटेल यांच्या लक्षात आणून दिली होती. खा. प्रफुल्ल पटेल यांचे दोन्ही जिल्ह्यांतील कोविड परिस्थितीवर लक्ष असून, ते याचा सातत्याने आढावा घेऊन आरोग्यविषयक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहेत.

........

निर्धारित दरानेच होणार पुरवठा

गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांतील सर्व मेडिकलमध्ये रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आले असून, त्याची शासनाने निर्धारित केलेल्या दरानेच ग्राहकांना विक्री करण्यात येणार आहे. त्यासाठी ग्राहकांना सुद्धा अतिरिक्त पैसे मोजावे लागणार नसल्याचे माजी आ. राजेंद्र जैन यांनी सांगितले.

Web Title: The word given by Praful Patel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.