संघटन मजबुतीसाठी सक्रियतेने काम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 08:49 PM2018-01-09T20:49:30+5:302018-01-09T20:50:01+5:30

भारतीय जनता पक्षाच्या धोरणांमुळे परिसरातील शेतकरी व जनता त्रस्त झाली आहे. असे असताना मात्र चांगले वातवरण तयार करण्याची गरज आहे.

Work actively for the strengthening of the organization | संघटन मजबुतीसाठी सक्रियतेने काम करा

संघटन मजबुतीसाठी सक्रियतेने काम करा

Next
ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा

आॅनलाईन लोकमत
गोंदिया : भारतीय जनता पक्षाच्या धोरणांमुळे परिसरातील शेतकरी व जनता त्रस्त झाली आहे. असे असताना मात्र चांगले वातवरण तयार करण्याची गरज आहे. याकरिता संघटन मजबुतीसाठी कार्यकर्त्यांनी सक्रीयतेने काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने ग्राम कुडवा, पांढराबोडी, काटी, नागरा व पांढराबोडी येथे आयोजीत कार्यकर्ता संमेलन व परिसरातील सरपंच-उपसरपंचांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमात मंचावर माजी आमदार राजेंद्र जैन, राष्ट्रवादी कॉंँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, अशोक गुप्ता, देवेंद्रनाथ चौबे, गंगाधर परशुरामकर, छोटू पटले, कुंदन कटारे, भोजराज चुलपार, शिव शर्मा, केतन तुरकर, किशोर तरोणे, जितेश टेंभरे, खुशबू टेंभरे, रजनी गौतम, चंदन गजभिये, डुलेश्वरी लिल्हारे, इमलाबाई चुलपार, प्रकाश देवाधारी, रमेश गौतम, अखिलेश सेठ, रमेश चुºहे, चित्रलेखा ढेकवार, किर्ती पटले, योगराज लिल्हारे, धुरनलाल सुलाखे व अन्य उपस्थित होते.
पुढे बोलताना खासदार पटेल यांनी, परिसराच्या विकासासाठी आम्ही सर्वांना सोबत घेऊन कामे केलीत व कामांसाठी सर्वांना सहकार्य केले. यातूनच दोन्ही जिल्ह्यांच्या विकासासाठी कित्येक कामे केली. मात्र भाजप सरकार येताच ती सर्वच कामे थांबली आहेत. सरकार प्रलंबीत योजनांसाठी निधी देत नसून केंद्र सरकार विविध योजना बंद करीत आहे. दुष्काळामुळे शेतकरी होरपळत आहे. अशात मात्र सरकार काहीच करीत नाही. यासाठी आता कार्यकर्ता व पदाधिकाºयांनी हे चित्र बदलण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सदस्यता अभियानातंर्गत जास्तीत जास्त लोकांना पक्षाशी जोडावे असे आवाहन केले.
माजी आमदार जैन यांनी, तालुक्यातील सर्वच जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत कार्यकर्त्यांनी सक्रीयतेने कार्य करावे. लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी तत्पर रहावे असे मत व्यक्त केले. प्रास्तावीक तालुकाध्यक्ष छोटू पटले यांनी मांडले. संचालन जितेश टेंभरे व सुनील पटले यांनी केले. आभार अंचल गिरी यांनी मानले.

सरपंच-उपसरपंच व सदस्यांचा सत्कार
कार्यक्रमात पांढराबोडीच्या सरपंच इमलाबाई चुलपार, उपसरपंच धुरनलाल सुलाखे, लोहारा सरपंच चित्रलेखा ढेकवार, उपसरपंच जितेंद्र भुरले, रायपूर उपसरपंच उमेशाबाई उईके, दासगाव खुर्द सरपंच माया कोल्हे, तेढवा उपसरपंच किरण गणवीर, नागरा उपसरपंच अमृतलाल पतेहे, अंभोरा उपसरपंच राजेश रामटेके, मुंडीपार सरपंच नितीन टेंभरे, मुरपार सरपंच यशवंत गेडाम यांच्यासह तालुक्यातील गावांतील ग्रामपंचायत सदस्यांचा खासदार पटेल यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पक्षाचा दुपट्टा घालून सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे, कार्यक्रमात अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्याने त्यांचे स्वागत खासदार पटेल, माजी आमदार जैन व अन्य पदाधिकाºयांनी केले.

Web Title: Work actively for the strengthening of the organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.