बााधितांच्या उपचारासाठी परिश्रम घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:28 AM2021-05-14T04:28:30+5:302021-05-14T04:28:30+5:30
देवरी : तालुक्यातील कोविडची भयावह स्थिती लक्षात घेता, गावागावात जनजागृती करुन नागरिकांना प्रोत्साहन देऊन शंभर टक्के लसीकरण करुन कोरोनावर ...
देवरी : तालुक्यातील कोविडची भयावह स्थिती लक्षात घेता, गावागावात जनजागृती करुन नागरिकांना प्रोत्साहन देऊन शंभर टक्के लसीकरण करुन कोरोनावर नियंत्रण मिळवून कोविडचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश खासदार अशोक नेते यांनी अधिकाऱ्यांना दिले.
देवरी येथील तहसील कार्यालयातील सभागृहात बुधवारी तालुक्यातील सर्व विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी नेते बोलत होते. देवरी तालुक्यातील विलगीकरणात असणाऱ्या रुग्णांसाठी खासदार फंडातून एक ऑक्सिजन कान्सन्ट्रेटर मशीन दिली. आरोग्य यंत्रणेला तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने तयारी करण्याचे आदेश दिले. या आढावा बैठकीला भाजपचे नेते झामसिंग येरणे, संतोष तिवारी, बंटी भाटिया, तालुकाध्यक्ष अनिल येरणे, महामंत्री प्रवीण दहीकर, विनोद भांडारकर, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष इंदरजितसिंग भाटिया, अल्पसंख्याक मोर्चाचे इमरान खान, देवरीचे उपविभागीय अधिकारी, प्रकल्प अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, पोलीस निरीक्षक, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी आणि अन्य विभागांचे प्रमुख अधिकारी, विभागप्रमुख उपस्थित होते.