कटंगी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:18 AM2021-07-24T04:18:23+5:302021-07-24T04:18:23+5:30

गोरेगाव तालुक्यातील कटंगी मध्यम प्रकलपांतर्गत गणखैरा लघु कालव्याकरिता ३१ गटांतील आराजी ४.४० हेआर. जमीन सन २००३ मध्ये संपादित केली ...

Work on left canal of Katangi project started | कटंगी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे काम सुरू

कटंगी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे काम सुरू

Next

गोरेगाव तालुक्यातील कटंगी मध्यम प्रकलपांतर्गत गणखैरा लघु कालव्याकरिता ३१ गटांतील आराजी ४.४० हेआर. जमीन सन २००३ मध्ये संपादित केली होती. त्यापैकी २८ शेतकऱ्यांनी मोबदला उचलला, परंतु ३ शेतकऱ्यांनी मोबदला उचल केला नाही. गट क्रमांक ८०४-१ चे क्षेत्र संपादन क्षेत्रात येत असून, कालव्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही पाइपमध्ये कॉन्क्रेट व माती भरल्याने लघु कालव्याचा शेतकऱ्यांना लाभ मिळत नव्हता. यामुळे शेतकऱ्यांकडून वारंवार सिंचनाची सोय उपलब्ध करण्याबाबतची मागणी होत होती. परंतु प्रकरण मार्गी लागू शकले नाही व २००९ पासून प्रलंबित या प्रकरणाबाबत शेतकऱ्यांनी आमदार विजय रहांगडाले यांच्याकडे मागणी केली.

यावर २७ जुलै २०२० रोजी आमदार रहांगडाले यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत संबंधित विभागाची संयुक्त बैठक घेऊन प्रकरण मार्गी लावण्याबाबत आदेशित केले होते. परंतु पाणी देण्यासंदर्भात काही आक्षेपित इसमांनी अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न करून काम अडविले होते. त्यावर पुन्हा आमदारांनी ही बाब जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांच्या निदर्शनास आणून प्रकरण मार्गी लावले व गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित डाव्या कालव्याचे पाणी सोडण्याकरिता डावा कालवा बांधकामाला सुरुवात करण्यात आली.

यावेळी आमदार रहांगडाले, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ओम कटरे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉ. लक्ष्मण भगत, दुर्गा ठाकरे, बँक संचालक रेखलाल टेंभरे, माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार, माजी प. स. सदस्य पुष्पराज जनबंधू, ओबीसी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष बबलू बिसेन, सरपंच धारा तुप्पट, उपसरपंच राजू मोहोबे, अनंता ठाकरे, मध्यम प्रकल्प कार्यकारी अभियंता अमृतराज पाटील, सहायक अभियंता सचिन मडकाम, शाखा अभियंता राजेश भैरम, राजेश रहांगडाले, मोहन दाणे, भूपेंद्र पारधी, खुनीलाल पारधी, शेतकरी श्यामकुवर पारधी, रोशनलाल ठाकरे, चमनलाल पारधी, जिवेंद्र पारधी व पोलीस विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Work on left canal of Katangi project started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.