कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे कामे रखडली
By admin | Published: August 17, 2014 11:15 PM2014-08-17T23:15:38+5:302014-08-17T23:15:38+5:30
विविध मागण्यांना घेऊन ११ तारखेपासून गोंदिया जिल्हा परिषदेसमोर कृषी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनामुळे कृषी कार्यालयातील विविध कामे रखडले आहेत.
सालेकसा : विविध मागण्यांना घेऊन ११ तारखेपासून गोंदिया जिल्हा परिषदेसमोर कृषी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनामुळे कृषी कार्यालयातील विविध कामे रखडले आहेत.
राज्य कृषी विभागातील महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघ पूजेची बैठक ८ आॅगस्टला घेण्यात आली. त्या बैठकीत कृषी विभागातील तांत्रिक संवर्ग, कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, कृषी अधिकारी, महाराष्ट्र कृषी सेवा वर्ग-२, महाराष्ट्र कृषी सेवा वर्ग-१, अधिक्षक कृषी अधिकारी, कृषी सहसंचालक, कृषी संचालक या संवर्गाच्या विविध मागण्यांना घेऊन आंदोलन करण्याची भूमिका घेण्यात आली.
त्यामुळे या आंदोलनात सालेकसा तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी जी.जी. तोडसाम, कृषी पर्यवेक्षक ए.बी. नवरे, आर.डी. तुरकर, कृषी सहायक वाय.जी. बारापात्रे, आर.बी. कोटकार, उके, भगत, यु.एस. निखारे, जी.एल.शेंडे, आर.एन. कागदीमेश्राम, गजभिये हे आंदोलनात सहभागी झाल्यामुळे तालुका कृषी कार्यालयात फक्त ५ कर्मचारीच काम करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास होत आहेत. त्यांच्या समस्या सोडविण्यास कुणीही लोकप्रतिनिधी आमदार नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
या कार्यालयात ३३ मंजूर पदापैकी १५ पदे रिक्त आहेत. १८ पदे भरलेली असून त्यातील १२ कर्मचारी हे धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती विषयक माहिती व मदत मिळने सध्या बंद आहे.
कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कृषी विभागातील तांत्रिक संवर्गात वेतनश्रेणी व दर्जावाढ निर्णयाची अंमलबजावणी करणे, कृषी विभागातील काही योजना जि.प.कडे हस्तांतरण करण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी कृषी व सहकार विभागाचा शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी इत्यादी मागण्यांना घेऊन कृषी विभागाचे कर्मचारी, अधिकारी आंदोलन करीत आहेत.
(तालुका प्रतिनिधी)