अंडरग्राउंड केबलचे काम जोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 10:11 PM2018-08-27T22:11:12+5:302018-08-27T22:11:28+5:30
वीज वितरण कंपनीकडून शहरातील मुख्य बाजार भागात अंडरग्राऊंड केबलच्या कामाला जोमात सुरूवात करण्यात आली आहे. ५० लाख रूपयांच्या निधीतून बाजारातील गांधी प्रतिमा ते श्री टॉकीज चौक व नेहरू चौक ते गांधी प्रतिमा चौकापर्यंत अंडरग्राऊंडचे काम सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : वीज वितरण कंपनीकडून शहरातील मुख्य बाजार भागात अंडरग्राऊंड केबलच्या कामाला जोमात सुरूवात करण्यात आली आहे. ५० लाख रूपयांच्या निधीतून बाजारातील गांधी प्रतिमा ते श्री टॉकीज चौक व नेहरू चौक ते गांधी प्रतिमा चौकापर्यंत अंडरग्राऊंडचे काम सुरू आहे.
बाजार भागात सध्या स्थितीत वीज तारांचे जाळे तयार झाले आहे. या वीज तारांतून कित्येकदा शॉटसर्कीट होऊन अपघात घडले आहेत. त्यामुळे वीज तारांचे हे जाळे धोकादायक ठरत आहेत. आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या प्रयत्नाने कॉंग्रेस शासन काळात सुशिलकु मार शिंदे उर्जा मंत्री असताना गोंदिया शहराला एपीडीआरपी योजनेत समाविष्ट करण्यात आले. यातून शहरातील जीर्ण वीज वाहिन्यांच्या नविनीकरणासोबतच १०० हून जास्त ट्रासंफॉर्मर लावण्यात आले. तसेच कमी वीज दाबाच्या समस्येसाठी भिमघाट, सेल्सटॅक्स कॉलनी, कटंगी व हिवरा येथे वीज उपकेद्रांची स्थापना करण्यात आली.
यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्याची समस्याही सुटली. वीज तारांच्या गुंतागुंतीची समस्या सोडविण्यासाठी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शहराला आयपीडीएस योजनेत समाविष्ट केले. या योजनेंतर्गत शहरातील जास्त जंनसंख्येचे घनत्व असलेल्या व अरूंद भागातील वीज वाहिन्या अंडरग्राऊंड करण्याचे काम सुरू आहे. यातूनच शहरातील नेहरू चौक ते दुर्गा चौक तसेच गांधी प्रतिमा ते श्री टॉकीज चौक पर्यंतच्या वीज तारांना अंडरग्राऊंड करण्याचे काम केले जात आहे. सध्या वीज खांबांवरून ग्राहकांना वीज जोडणी दिली जाणार आहे. मात्र भविष्यात वीज खांब हटवून अंडरग्राऊंड करण्याचीही योजना आहे. बाजार भागातील वीज तार अंडरग्राऊंड होणार असल्याने जीवंत वीज तारांची गुंतागंूत व त्यामुळे निर्माण होणार धोका कायमचा टळणार आहे. बाजार भागात इमारतींना लागून वीज तार जात असून असे हे धोकादायक प्रकार संपुष्टात येतील.