सत्ता परिवर्तनासाठी एकजुटीने काम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:28 AM2018-01-25T00:28:59+5:302018-01-25T00:29:38+5:30

गोंदिया जिल्ह्याचा वाली कोणीच नाही. जिल्ह्याला राज्यात मंत्रीपद लाभले मात्र विकास नाही. शेतकरी संकटात आहे. सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार नाही, झाशीनगर उपसा योजना रखडली आहे. शासनाच्या विविध योजनांचा निधी बंद झाला.

Work united for power change | सत्ता परिवर्तनासाठी एकजुटीने काम करा

सत्ता परिवर्तनासाठी एकजुटीने काम करा

googlenewsNext
ठळक मुद्देप्रफुल पटेल : अर्जुनी-मोरगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : गोंदिया जिल्ह्याचा वाली कोणीच नाही. जिल्ह्याला राज्यात मंत्रीपद लाभले मात्र विकास नाही. शेतकरी संकटात आहे. सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार नाही, झाशीनगर उपसा योजना रखडली आहे. शासनाच्या विविध योजनांचा निधी बंद झाला. सत्ताधारी पक्ष साध्या चावडी बांधकामाचाही गाजावाजा करतो. एक नाय अनेक समस्या जिल्ह्यात आहेत. लोकांना समस्या सोडविण्यासाठी संघर्ष व रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा या देशाचे चित्र राष्ट्रवादी काँग्रेसच बदलवू शकते. केंद्र व राज्यात सत्ता परिवर्तन घडून आणण्यासाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन खा. प्रफुल पटेल यांनी कार्यकर्त्याना केले.
बुधवारी स्थानिक प्रसन्न सभागृहात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी माजी आ. राजेंद्र जैन, जि.प.गटनेते गंगाधर परशुरामकर, मनोहर चंद्रिकापुरे, प्राचार्य यशवंत परशुरामकर, जि.प.सदस्य किशोर तरोणे, केतन तुरकर, जि.प.सदस्य भास्कर आत्राम, पं.स.सदस्य सुधीर साधवानी, जनार्धन काळसर्पे, रतीराम राणे, नारायण भेंडारकर, नामदेव डोंगरवार, चित्रलेखा मिश्रा, भोजराम रहिले, राकेश लंजे, लोकपाल गहाणे, शिशुला हलमारे, योगेश नाकाडे, यशवत गणवीर उपस्थित होते.
पटेल म्हणाले, गोंदिया जिल्हा परिषदेत अभद्र युती झाली. अशा युतीमुळे आमच्या पक्षाला फायदाच होतो. ८ वरुन २० वर संख्याबळ आले येणाºया काळात २८ येतील, म्हणून आम्हाला युतीची गरजच नाही. शेतकरी संकटात आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी रोवणीच झाली नाही, जिथे रोवणी झाली तिथे पिकाला कीडीने ग्रासले गेल्या चार वर्षात धानाचे भाव दोन हजारावर गेले नाही, या सरकारची कर्जमाफीची मनस्थितीच नाही.
कर्जमाफीसाठी आॅनलाईनसारखी किचकट प्रक्रिया अवलंबून शेतकºयांना वारंवार हेलपाट्या घालायला लावण्याचे काम केले. अद्यापही अनेक शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. अनेक रस्त्यांचे भूमिपूजन झाले, मात्र संबंधित विभागाजवळ रस्त्याची यादी नाही. ५४०० कोटी रुपयांची रस्ते गेली कुठे? असा प्रश्नही त्यांनी केला. या मतदारसंघाचे आमदार हे मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री असताना सुध्दा बीआरजीएफ, आयआरडीपी, यशवंत ग्राम योजनेसारख्या विविध योजनांचा निधीच बंद झाला.
आता गावांचा विकास होईलच कसा असा सवाल केला. जनधनचे गोरगरीबांना खाते उघडायला लावले मात्र या खात्यात ठणठणाट आहे. चावडीचे बांधकाम केले तर हे गाजावाजा करतात आम्ही सीएसआर मधून अनेक विकासकामे केली त्याची चर्चा साधी चर्चाही करत नाही. राजकारण करायला शेतकरी व ओबीसी दिसतो मात्र त्यांच्या समस्या दिसत नाही. विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती मिळत नाही.
अशा अनेक समस्यांचा पाढा खा. पटेल यांनी जनतेसमोर वाचला. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कार्यक्रमाचे संचालन जे. के.काळसर्पे, प्रास्ताविक लोकपाल गहाणे यांनी केले. उपस्थितांचे आभार अनिल लाडे यांनी मानले.

Web Title: Work united for power change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.