कार्यकर्ता हीच भाजपाची खरी शक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 01:03 AM2018-11-21T01:03:28+5:302018-11-21T01:04:41+5:30

जनसंघ ते भाजप या पक्षाच्या प्रवासात अनेक कार्यकर्त्यांनी आपले संपूर्ण जीवन पक्षासाठी समर्पित केल्याने आज जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपची ओळख निर्माण झाली आहे.

The worker is the true power of BJP | कार्यकर्ता हीच भाजपाची खरी शक्ती

कार्यकर्ता हीच भाजपाची खरी शक्ती

googlenewsNext
ठळक मुद्देआंबटकर : शहर भाजयुमो व महिला मोर्चा दिवाळी स्नेहमीलन सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जनसंघ ते भाजप या पक्षाच्या प्रवासात अनेक कार्यकर्त्यांनी आपले संपूर्ण जीवन पक्षासाठी समर्पित केल्याने आज जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपची ओळख निर्माण झाली आहे. भाजयुमो व महिला मोर्चाद्वारे दिवाळी स्नेहमीलन कार्यक्र मात वरिष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार हे पक्षातील संस्कार प्रकट करणारे असून कार्यकर्ता हीच भाजपाची खरी शक्ती आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश महामंत्री डॉ. रामदास आंबटकर यांनी केले.
शहर भाजयुमो व महिला मोर्चाच्या संयुक्तवतीने शुक्रवारी (दि.१६) आयोजित दिवाळी स्नेहमिलन सोहळयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. रमेश कुथे होते. यावेळी प्रामुख्याने आ. डॉ. परिणय फुके, जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी खा. चुन्नीभाऊ ठाकूर, माजी खा. डॉ. खुशाल बोपचे, माजी आ. भेरिसंह नागपुरे, माजी जि.प. अध्यक्ष नेतराम कटरे, जि.प. उपाध्यक्ष अल्ताफ हमीद, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रचना गहाणे, जि.प. सभापती विश्वजीत डोंगरे, जिल्हा संघटन महामंत्री विरेंद्र अंजनकर, डॉ. राधेश्याम अग्रवाल, शहर अध्यक्ष सुनिल केलनका, माजी नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, जिल्हा महामंत्री रविकांत बोपचे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष पंकज रहांगडाले, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष भावना कदम, किशोर हालानी, जिल्हा संपर्क प्रमुख संतोष चव्हाण, संजय कुळकर्णी, नप उपाध्यक्ष शिव शर्मा, नगरसेवक भरत क्षत्रीय, माजी जिप अध्यक्ष रजनी नागपुरे, नप सभापती आशालता देशमुख, नगरसेवक राजकुमार कुथे, वरिष्ठ कार्यकर्ते गोविंददराव पुंड, सुखराम महारवाडे, महिला मोर्चा शहर अध्यक्ष मैथीली पुरोहित, युवा मोर्चा शहर अध्यक्ष नेत्रदीप गावंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. आंबटकर यांनी, भविष्यात होणाऱ्या निवडणुकांसाठी पक्षातील बुथ प्रमुख, शक्ती प्रमुख यांनी जोमाने कार्य करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लोककल्याणकारी योजना व निर्णय जनतेपर्यंत पोहचवावे. आजचा हा दिवस संकल्प घेण्याचा असून पक्षाची शक्ती वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी अधिक मेहनत घ्यावी, असे सांगीतले. अध्यक्षीय भाषणात कुथे यांनी, येणाºया निवडणुकांमध्ये विजय संपादन करण्यासाठी युवा मोर्चा, महिला मोर्चासह प्रत्येक आघाडी व बुथ रचना, शक्तीशाली करण्याचे मत व्यक्त केले. आ. फुके यांनी, स्नेहमिलन हे मित्रत्व व प्रेमाचा बंध घट्ट करण्याचे एक माध्यम असल्याचे सांगितले. यानिमित्त त्यांनी सीएम चषक स्पर्धेबद्दल माहिती देऊन स्पर्धेत अधिकाधिक युवक व युवतींना सहभागी करु न घ्यावे असे कार्यकर्त्यांना सांगीतले.
यावेळी जिल्हाध्यक्ष पटले व नगराध्यक्ष इंगळे यांनी वरिष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार हा नवीन कार्यकर्त्यांना उर्जा देणारा असल्याचे सांगीतले. प्रास्ताविक महिला मोर्चा शहर अध्यक्ष मैथीली राम पुरोहित यांनी मांडले. संचालन जिल्हा प्रचार-प्रसार प्रसिद्धी प्रमुख जयंत शुक्ला यांनी केले. आभार संजय कुळकर्णी यांनी मानले.

पक्षातील वरिष्ठांचा सत्कार
या कार्यक्रमाचे निमित्त साधून पक्षातील वरिष्ठ सदस्य माजी खा. चुन्नीलाल ठाकूर, जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. राधेश्याम अग्रवाल, भाजपाचे वरिष्ठ कार्यकर्ते गोंिवदराव पुंड, सुखराम महारवाडे यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: The worker is the true power of BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा