आश्रमशाळेतील कर्मचारी लागले कामाला
By admin | Published: December 11, 2015 02:14 AM2015-12-11T02:14:26+5:302015-12-11T02:14:26+5:30
येथील जनकल्याण शिक्षण संस्थेद्वारा संचालित दिनदयाल उपाध्याय आदिवासी आश्रमशाळा सुरू होऊनही विद्यार्थी व कर्मचारी हजर नव्हते.
गोठणगाव : येथील जनकल्याण शिक्षण संस्थेद्वारा संचालित दिनदयाल उपाध्याय आदिवासी आश्रमशाळा सुरू होऊनही विद्यार्थी व कर्मचारी हजर नव्हते. याबाबत ‘लोकमत’मध्ये ‘आश्रमशाळा वाऱ्यावर, विद्यार्थी व कर्मचारी गैरहजर’ या मथळ्याखाली बातमी प्रकाशित झाली. याची दखल जनकल्याण शिक्षण संस्था आमगाव यांनी घेऊन आपल्या कर्मचाऱ्यांना योग्य ते निर्देश दिले. त्यामुळे ही आश्रमशाळा पूर्ववत सुरू झाली आहे.
सध्या या आश्रमशाळेत निवासी विद्यार्थी ३२८ व अनिवासी विद्यार्थी १९ असे एकूण ३४७ विद्यार्थी हजर आहेत.
आश्रमशाळेत जिल्ह्यातील ५२ विद्यार्थी जास्त आहेत. त्यात कोटगुल, महाका, नागपूर, नांगणडोह, तिरखुरी, बोरटोला, गरगडा, चांदोना, भिमानपावली, सोनसरी, चांदागड, सलंगटोला, भरनोली, राजोली, शिवरामटोला, कन्हाळगाव, तुकुम, सायगाव, गवर्रा, केळवद, इळदा, खैरीटोला, चिखली, करांडली, प्रतापगड, झाशीनगर, देवरी, सालई, पिपरखारी, बोरगाव, आमगाव, पदमपूर, बिर्सी, बोरकन्हार आदी गावातील विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. (वार्ताहर)